जामखेड टाइम्स वृत्तसेवा । देशाच्या संसदेचे कामकाज नेमकं कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव व्हावा यासाठी जामखेड शहरातील कालिका पोदार लर्न स्कूलमधील इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी संसदीय कामकाजाचे आयोजन करण्यात आले होते. 2 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात काही विद्यार्थी मंत्री, तर काही विद्यार्थी विरोधी गटाचे खासदार तर काही विद्यार्थी सचिव बनले होते.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शपथविधी सोहळा, दिवंगत व्यक्तीस श्रध्दांजली, परदेशी सरकारी प्रतिनिधींचे स्वागत, प्रश्नोत्तराचा तास, अविश्वास ठराव आणि विधेयक पारित करणे तसेच नवीन कायदे बनवण्याचा ठोस अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी संसदीय कामकाजात विद्यार्थी चांगलेच रमून गेले होते.

जामखेडच्या कालिका पोदार लर्न स्कूलमध्ये प्रति संसद अवतरली होती. संसदेतील प्रतिनिधी आपली भूमिका कशी वठवतात याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी जिवंत केले. संपुर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून आपल्या भूमिका पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी संसदीय कामकाज अतिशय उत्कृष्टपणे सादर केले. यामाध्यमांतून विद्यार्थ्यांना संसदेच्या कामकाजाचा व्यावहारिक अनुभव मिळाला.

कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य प्रशांत जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन संचालन ॲलेक्स फिग्रेडो यांनी केले. कालिका पोदार लर्न स्कुल विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. संसदीय कामकाजाचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना नवा अनुभव दिल्याबद्दल स्कूलचे कौतुक होत आहे.
