चंद्रकांत पाटलांच्या बेताल वक्तव्याचे जामखेेडमध्ये उमटले पडसाद, भिमसैनिकांनी जोडे मारत नोंदवला चंद्रकांत पाटलांचा निषेध !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद 9 डिसेंबर रोजी रात्री जामखेड शहरात उमटले.आक्रमक झालेल्या भिमसैनिकांसह बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला. तसेच पाटील यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खर्डा चौकात हे अंदोलन पार पडले.
महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डाॅ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहे. भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा सातत्याने अपमान केला जात असल्याने बहुजन समाज चवताळून उठला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ जामखेड शहरातील भिमसैनिकांनी शुक्रवारी रात्री शहरातून मोटारसायकल रॅली काढली आणि मंंत्री पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर खर्डा चौकात चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी झालेल्या अंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, बापूसाहेब गायकवाड ,जमीर सय्यद, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, राजेंद्र सदाफुले, रवि सोनवणे, सचिन सदाफुले,संदेश घायतडक, विनोद सोनवणे,प्रमोद सदाफुले,दिपक घायतडक,सचिन सदाफुले, सुर्यकांत सदाफुले,बाबा सोनवणे, सोमनाथ राऊत, मुकुंद घायतडक,सुर्यकांत सदाफुले, विनोद घायतडक,दिपक सदाफुले, विकी गायकवाड, मनीष घायतडक, प्रतिक निकाळजे,अमोल गव्हाळे सह शेकडो भिमसैनिक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक कन्हेरे यांना निवेदन दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.