सोशल मिडीयावर चमकु लागले भावी नगरसेवक

जामखेड। सत्तार शेख

जामखेड नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतो. सध्या शहरात इच्छूकांनी सोशल मिडीयावर भावी नगरसेवक म्हणून मिरवण्यास सुरूवात केली आहे. पाच वर्षे अडगळीला पडलेले तथाकथित भावी नगरसेवकही आता प्रभागात चमकू लागले आहेत. जनतेशी संवाद साधू लागले आहेत.

मागील पाच वर्षात जामखेड नगरपरिषदेत सत्तेत असलेल्या सर्वच नगरसेवकांनी पुन्हा दुसरी इनिंग खेळण्याची तयारी केली आहे.कंबर कसत प्रभागात जनसंपर्क वाढवला आहे. यंदाची निवडणुक भाजप विरूध्द राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी विरूध्द इतर सर्व अशी रंगताना दिसू शकते. त्यातुन उमेदवारी देताना राजकीय पक्षांची दमछाक होणार आहे. यंदा सर्वच पक्षात बंडोबांचा उद्रेक होईल अशी स्थिती आहे.