रशिया युक्रेन युध्दाने घेतला भारतीय विद्यार्थ्याचा बळी । Russia-Ukraine war kills Indian student

युक्रेन: Russia-Ukraine war kills Indian student  : गेल्या चार पाच दिवसांपासून रशियाने युक्रेन या देशात घुसखोरी करत युध्द पुकारले आहे. युक्रेन देशातील अनेक शहरात रशियन सैन्याने हल्ले चढवले आहेत. मिसाईलचा मारा, तोफांचा मारा, बाँब स्फोट यामुळे युक्रेनची भूमी युध्दभूमी बनली आहे.

युक्रेन देशात तब्बल 20 हजाराच्या आसपास भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. हवाई वाहतुक बंद असल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने भारतात आणण्याचा मार्ग कठिण झाला आहे. अश्यातच आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

युध्दभूमी युक्रेनमध्ये रशियाने हल्ला वाढवला आहे. खारकीव या शहरात झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची समोर आली आहे. या घटनेनं भारतात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्र सरकार विरोधात आता टीकेची झोड उठवली जाऊ लागली आहे.

युक्रेनमध्ये कर्नाटकातील विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येताच युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

युक्रेनमधील खारकीव शहरात झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील नवीन शेखरप्पा (Naveen Shekharappa ) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन हे चौथ्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत होते. नवीन यांच्या मृत्यूची माहिती विदेश मंत्रालयाने जारी केली आहे.