moto g71 5G : मोटोरोलाने भारतीय बाजारात आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । मोटोरोला (motorola) या मोबाईल उत्पादक कंपनीने भारतीय बाजारात एक जबरदस्त नवा 5G स्मार्ट फोन लाँच केला आहे. ज्याची किंमत 20 हजाराच्या आसपास असणार आहे. (Motorola launches Moto G71 5G smartphone in India)

मोटोरोलाने भारतीय बाजारात लाँच केलेल्या मोबाईलचे नाव moto g71 5G असे आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात 50 मेगाफिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यात बॅकपॅनलला तीन कॅमेरे आहेत. या फोनमध्ये स्टॉक एंड्राॅईड OS देण्यात आले आहे. या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी तसेच 33W चा फास्ट चार्जर  देण्यात आला आहे.

मोटोरोलाचा moto g71 5G स्मार्टफोनची किंमत फक्त 18 हजार 999 इतकी आहे. हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी रॅममध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.  आर्कटिक निळा आणि हिरव्या अश्या दोन कलरची सीरिज कंपनीने सादर केली आहे.

Motorola launches Moto G71 5G smartphone in India
Photo Credit – Motorola

moto g71 5G या स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्डची व्यवस्था आहे. हा 5G मोबाईल असून या मोबाईलला 6.4 इंचाची फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या मोबाईलचा रिफ्रेश रेट 60 Hz इतका आहे. हा फोन स्नैपड्रैगन 695 चिपसेट सहीत उपलब्ध आहे. ज्यात 6 जीबी रॅम देण्यात आली आहे.

Motorola launches Moto G71 5G smartphone in India
Photo Credit – Motorola

moto g71 5G फोनमध्ये तीन कॅमेरा देण्यात आले आहेत. प्रायमरी कॅमेरा 50 मेगाफिक्सलचा आहे. ज्यात  f/1.8 लेंस आहे. दुसरा कॅमेरा 8 मेगाफिक्सलचा आहे. हा कॅमेरा अल्ट्रा वाईल्ड अँगलची लेंस देण्यात आली आहे. तर तिसरा कॅमेर्‍यातून मायक्रो शुटची सुविधा देण्यात आली हा 2 मेगाब्लॉक कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 16 मेगाफिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola launches Moto G71 5G smartphone in India

moto G71 5G या स्मार्ट फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 33 W फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज करता येणार आहे. तसेच यात 3.5 mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.  या फोनच्या बॅक पॅनलवर (पाठीमागील बाजूस) फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. बायोमेट्रिक पध्दतीने फोनचा लाॅक उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Motorola launches Moto G71 5G smartphone in India
Photo Credit – Motorola

मोटोरोला कंपनीने भारतात सादर केलेल्या moto g71 5G या स्मार्टफोनची किंमत 20 हजाराच्या आत असल्याने सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये हा जबरदस्त फोन घेण्याची संधी आहे. या फोनची स्पर्धा Redmi Note 11T 5G, Realme 8S 5G, Narzo 30 5G,  आणि iQoo Z3 यांच्याशी होणार आहे. moto g71 5G हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट याई काॅमर्स साईटवर विक्रीस उपलब्ध आहे.