इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायचीय ? जाणून घ्या टॉप 4 पर्याय – Top 4 electric bike

जाणून घ्या टॉप 4 पर्याय सविस्तर – Top 4 electric bike

Top 4 electric bike | पेट्रोलच्या दरवाढीमुळे मोटारसायकल वापरणारा ग्राहक आता ईलेक्ट्रीकल बाईक खरेदीकडे वळू लागला आहे. देशात झपाट्याने ईलेक्ट्रिकल बाईक्सची बाजारपेठ विस्तारू लागली आहे. या क्षेत्रात देशी अन परदेशी कंपन्यांनी उड्या घेत नवनवीन ईलेक्ट्रिकल बाईक सादर करण्याचा धडाका लावला आहे.

ग्रामीण भागात या ईलेक्ट्रिकल बाईकला मोठी मागणी वाढली आहे. अश्यातच भारतीय बाजारात आणखी दोन नव्या ईलेक्ट्रिकल बाईक दाखल झाल्या आहेत.या बाईकचे नाव Tork Kratos आणि Tork Kratos R आहे. ईलेक्ट्रिकल बाईक खरेदीस इच्छुक असाल तर Top 4 electric bike कोणत्या ? चला तर मग जाणून घेऊयात

Tork Kratos R  बाईकचे वैशिष्ट्ये

1) 120 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज
2)  टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रतितास
3) बाईकमध्ये 4 किलो वॅट बॅटरी असेल
4) बॅटरी 1 तासात 80 टक्के पर्यंत चार्ज होते
5) फाइंड माय व्हीकल  फिचर्स उपलब्ध

Revolt RV 400 बाईकचे वैशिष्ट्ये

 1) 150 किलोमीटरची ड्रायविंग रेंज देते
2) बाईकची बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी 4.5 तास लागतात.
3) टॉप स्पीड 80 किमी
4) बाईकमध्ये ECO, Normal आणि Sport  या तीन मोड्सचा समावेश
5) कंपनीचा दावा – इलेक्ट्रिक बाईक मध्ये 100 किलोमीटरवर अंदाजे 9 रुपयेचा खर्च येईल.
6) इलेक्ट्रिक बाईकची किंमत दिल्ली (एक्स-शोरूम) 90,799 रुपये एवढी आहे.

Joy e-bike Monster चे वैशिष्ट्ये

1)  75 किलोमीटरची रेंज
2) Joy e-bike Monster मध्ये लिथियम आयनची बॅटरी
3)  250W चे DC ब्रेशलेस हब मोटर
4) एक वेळचा चार्ज करण्यासाठी 4 ते 5 तास लागतात.
5) 280 किलोमीटरसाठी 70 रुपयांचा खर्च येतो
6) शोरूम मध्ये किंमत 98,666 रुपये एवढी आहे.

भारताची पहिली इलेक्ट्रिक रेंजर्स मोटरसायकल कोमाकी रेंजर ने सुद्धा बाईक विश्वात पदार्पण केले आहे. ही बाईक मंगळवारी लाँच झाली.या बाईकचे डिझाईन हार्वे डेविडसन सारखेच आहे.

komaki ranger बाईकचे  वैशिष्ट्ये

1) 4000 वॉल्टची मोटर
3)  बाईक तीन रंगांमध्ये बाजारात – Garnet Red, Deep Blue आणि Jet Black या रंगात ही बाईक दिसेल.
4) ब्लूटूथ साउंड सिस्टम, साइड स्टँड सेंसर, क्रूजर कंट्रोल फीचर्स, एंटी थीफ्ट लॉकिंग सिस्टम
5) डुअल स्टोरेज बॉक्स चा ऑप्शन देण्यात आला आहे.

बाजारात अनेक ईलेक्ट्रिकल बाईक येत आहेत. परंतू यातील Top 4 electric कोणत्या यावर थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित ईलेक्ट्रिकल कंपनीच्या जवळच्या शोरूम ला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.