- Advertisement -

Big Breaking : Facebook announces new name : फेसबुकने नाव बदलले, केली नवीन नावाची घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Facebook announces new name । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मिडीया साईट अशी ओळख असलेल्या फेसबुक (facebook) ने आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक आता मेटा (Meta) या नावाने ओळखले जाणार आहे. रीब्रँडींग (Rebranding) करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल फेसबुकने उचलले आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा फेसबुकने ट्विटरवर केली आहे.(Facebook new name is Meta)

फेसबुकला मेटाव्हर्स कंपनी म्हणून सादर करण्याच्या योजनेचा भाग म्हणून रीब्रँडींग केले जात आहे. फेसबुक या वर्षी त्याच्या व्हर्च्युअल वर्ल्ड मेटाव्हर्ससाठी $10 बिलियनची गुंतवणूक करणार आहे. Facebook च्या Virtual आणि Augment Realty (VR/AR) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन आभासी अनुभवाचा हा एक नवीन टप्पा असेल. कंपनी तिच्या फेसबुक रियल्टी लॅबवर अब्जावधी डॉलर्स खर्च करेल, ज्याला मेटाव्हर्स डिव्हिजनने एआर आणि व्हीआर हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सामग्री तयार करण्याचे काम दिले आहे.

फेसबुकने गेल्या महिन्यात प्रथम फेसबुक मेटाव्हर्स तयार करण्याची आपली योजना उघड केली. मेटाव्हर्स हा शब्द डिजिटल जगात आभासी, परस्परसंवादी जागेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. मेटाव्हर्स हे खरं तर एक आभासी जग आहे जिथे एखादी व्यक्ती शारीरिकरित्या अस्तित्वात नसली तरीही अस्तित्वात असू शकते. यासाठी आभासी वास्तवाचा वापर केला जातो.

फेसबुकने गुरूवारी मध्यरात्री नाव बदलत असल्याची घोषणा ट्विट करत केली आहे. फेसबुकने या ट्वाटमध्ये म्हटले आहे की, आम्ही Meta ची घोषणा करत आहोत, Meta हे Facebook कंपनीचे नवीन नाव आहे. मेटा मेटाव्हर्स तयार करण्यात मदत करत आहे, अशी जागा जिथे आम्ही 3D मध्ये खेळू आणि कनेक्ट करू. सामाजिक संबंधाच्या पुढील अध्यायात आपले स्वागत आहे.

Announcing @Meta — the Facebook company’s new name. Meta is helping to build the metaverse, a place where we’ll play and connect in 3D. Welcome to the next chapter of social connection.

First Publisher : jamkhedtimes.com

Web titel : Facebook announces new name Facebook new name is Meta

वेब शीर्षक: फेसबुकने केली नवीन नावाची घोषणा फेसबुक आता मेटा या नावाने ओळखले जाणार !