महाराष्ट्राची आधुनिक सावित्री ‘सुनंदा पवार’

‘नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी’ या ओळींचा खरा अनुभव आजच्या समाजामध्ये प्रकर्षाने निदर्शनास येताना दिसतो .यामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारची दुःखे ,संकटे ,अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे ,परंतु दुसरी बाजू पाहता समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की, ते तळागाळातील नागरिकांच्या व महिलांच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात यामध्ये सर्व क्षेत्रातले लोक आपापल्या परीने समाज हितासाठी प्रयत्न करताना दिसतात.

वास्तविक पाहता समाजामध्ये पुरुषांपेक्षा महिला या मागे राहिल्याचे दिसून येते .मात्र या महिलांना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून स्वयंसिद्धा बनवण्यासाठी आर्थिक मदत व मार्गदर्शन करण्यासाठी बारामती येथील पवार कुटुंबातील सुनंदा पवार या अतिशय प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करताना दिसत आहेत. त्यांच्याकडून राज्यातील महिलांना विविध स्तरावरून पाठबळ मिळते ,यामुळे अनेक महिला स्वतः व्यावसायिक बनून स्वयंसिद्धा बनल्याची उदाहरणे पहावयास मिळतात

सुनंदा पवार ह्या कै. आप्पासाहेब पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुनबाई आहेत, तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शन करणारे शेती अभ्यासक व ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार यांच्या सुविद्य पत्नी तसेच कर्जत जामखेड चे विद्यमान आमदार रोहित दादा पवार यांच्या मातोश्री आहेत. सुनंदा पवार यांना महाराष्ट्रभर वहिनीसाहेब या नावाने ओळखले जाते. त्यांनी राज्यातील तळागाळातील रोजंदारीने काम करणाऱ्या हजारो महिलांना व्यवसायिक बनवून मालक बनवण्याची किमया घडवल्याची उदाहरणे आहेत.

महिलांसाठी काम करत असताना, त्यांनी शारदा महिला संघ या नावाची संस्था शारदानगर येथे सुरू करून यामार्फत महिलांना विविध उपक्रमातून व्यासपीठ मिळवून दिले. स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करणे ,विविध प्रकारची व्यवसायिक प्रशिक्षणे घेणे ,असे कार्य सुरू केले .या संस्थेला अनेक महिला बचत गट जोडले गेले आहेत. या गटातील व गटा बाहेरील ही अनेक महिला वहिनीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामुहिक व वैयक्तिक व्यवसाय करताना दिसून येतात.

समाजातील कर्तृत्ववान महिलांचे नेतृत्व सुनंदा पवार करताना दिसतात. तसेच विविध उपक्रमांतून स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात .महिलांना फक्त व्यवसायिक प्रशिक्षण देणे ,व्यवसाय सुरू करण्यासाठी परावृत्त करणे ,एवढ्यावर त्या थांबत नाहीत ,तर ज्या व्यवसायिक महिला आहेत त्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठीही आपल्या शारदा महिला संघाच्या टीम मार्फत प्रयत्न करत असतात ,यामध्ये विविध कंपन्यांची, दवाखान्याची ,होलसेल व इतर व्यावसायिकांच्या ऑर्डर्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत असतात.

याबरोबरच शारदा महिला संघामार्फत प्रत्येक वर्षी पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारामध्ये भीमथडी जत्रा हा कार्यक्रम राबविला जातो. या जत्रेमध्ये खाद्यपदार्थांचे व इतर स्टॉलही लावले जातात .यामध्ये शारदा महिला संघ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या बहुतांश गटांना स्टॉल प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळवता येते .यासाठी सुनंदा पवार स्वतः वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सूचना देत असतात.

भीमथडी जत्रेत प्रमाणेच शारदा नगर येथील कृषी विज्ञान केंद्र येथे प्रत्येक वर्षी कृषी प्रदर्शन भरवले जाते .यामध्ये देशातून व राज्यातून अनेक शेतकरी शेती विषयक नवनवीन माहिती मिळविण्यासाठी या या प्रदर्शनाला भेट देत असतात. या प्रदर्शनाला राजकीय क्षेत्रातील अनेक लोक भेट देऊन कृषी प्रदर्शनाविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त करतात.

कृषी प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे स्टॉल उभारले जातात या प्रदर्शनामध्ये ही माझ्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून सुनंदा पवार बचत गटातील अनेक महिलांना व गटांना या प्रदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये स्टॉल देऊन सहभागी करतात .या कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी शारदा नगर येथील व्यवस्थापन कमिटी यशस्वीरित्या पार पाडत असते.

ग्रामीण भागातील महिला गटांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांची दिशा चुकते .ही बाब लक्षात घेऊन सुनंदा पवार यांनी आपले कार्य शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त खोलपर्यंत रुजवल्याचे दिसून येते .त्यांनी महिला बचत गटांना वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी प्राप्त करून दिल्या आहेत.

यामध्ये महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी बेबी किड्स, पेटिकोट, मसाला, शेवई, बॅग, बेकरी, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय ,कडूनिंब प्रोजेक्ट , द्रोण व पत्रावळी, खारीक खोबरे ,थालपीठ, उन्हाळी सांडगे, केसं संकलन केंद्र ,अगरबत्ती, स्वीट होम, काथ्या बनविणे, कुकूटपालन समूह शेती ,पार्लर लोणची, केटरिंग यासारखे व्यवसाय सुरू केले आहेत .भविष्य काळामध्ये ही या व्यवसायांमध्ये वाढ केली जाणार असून नवीन व्यवसाय समाविष्ट केले जाणार आहे.

कर्जत जामखेड मधील महिलांचा सहभाग

कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार म्हणून रोहित दादा पवार निवडून आल्यानंतर ,सुनंदा पवार यांनी या मतदार संघातील महिलांचे गट बनवण्याच्या सूचना केल्या व या महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था या संस्थेची स्थापना केली .या संस्थेच्या मार्फत कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये असलेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन आपापले व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या महिलांना सुनंदा पवार व आमदार रोहित पवार यांनी आर्थिक पाठबळ व मार्गदर्शन केले. तसेच येथील महिलांनाही भीमथडी जत्रा व कृषी प्रदर्शन या कार्यक्रमामध्ये स्टॉल उभारण्यासाठी सहभागी करून घेतले, यामुळे येथील महिलाही व्यवसायिक बनत आहेत.

महिला बचत गटातील महिलांना व्यवसाय करत असताना आर्थिक अडचण आहे ,ही अडचण दूर करण्यासाठी सुनंदा पवार यांनी ऍग्रो पणन सोसायटीमार्फत आर्थिक मदत सुरू केली आहे. यामुळे महिलांना एक प्रकारची व्यवसायिक उभारी मिळताना दिसते. एकूणच सर्व स्तरातील महिलांना सुनंदा पवार यांच्याकडून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मदत होताना दिसते . यामुळे सुनंदा पवार या आधुनिक महाराष्ट्राच्या सावित्री आहेत .असे म्हणावे लागेल.

महिला व मुली यांचे पालकत्व

आजच्या समाजातील महिला व मुलींमध्ये अजूनही मागासलेपणा दिसून येत असतो. ही बाब लक्षात घेऊन सुनंदा पवार यांनी महिलांना व शालेय विद्यार्थिनी यांना एकत्रित घेऊन स्वच्छतेविषयी चे उपक्रम राबवले यामध्ये मासिक पाळी मध्ये घ्यावयाची काळजी ,तसेच स्वच्छतेचे महत्व समजावून सांगत महिला व मुली यांचे पालकत्व पूर्ण केले असे म्हणावे लागेल.

स्त्रीशक्तीचा सन्मान

सुनंदा पवार यांच्या पुढाकारातून व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत समाजामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने सन्मान मिळविलेल्या महिलांचा यथोचित सन्मान सोहळा शारदा नगर येथील कै. आप्पासाहेब पवार सभागृहांमध्ये प्रत्येक वर्षी करण्यात येतो. यामुळे महिलांमध्ये उत्साह वाढताना दिसतो. या कार्यक्रमाचे नियोजन शारदा महिला संघ यांच्या वतीने केले जाते.

स्वावलंबी स्त्री घडवणे हेच ध्येय

ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट विश्वस्त शारदा महिला संघ यांच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी बचत गटांमधील महिलांना स्वावलंबनातून व्यवसायिक बनविण्याची भूमिका घेत गाव तेथे महिला उद्योजक योजना सुरु केली आहे .महिलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यवसायिक प्रगती झाली पाहिजे. या उद्देशाने हे काम सुरू असून ,शारदा महिला संघाचे विभाग प्रमुख बाळासाहेब नगरे यांच्यासह प्रकाश साळुंखे सर, अभिषेक जगताप सर ,तात्यासो शेलार ,निकिता महामुनी गजानन मोकाशी हे काम करत आहेत.

( लेखक – राजाराम राऊत, निमगाव केतकी, 9890582513 )