आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू राहूल आवारे अडकला लग्नबंधनात! (DYSP Rahul Aaware Wedding)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील माळेवाडी या मुळ गावचे रहिवासी असलेले आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू तथा डीवायएसपी राहुल आवारेंनी रविवारी आपल्या जीवनातील एका नव्या इनिंगला सुरूवात केली. (international wrestler Rahul Aware wedding ceremony) अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर काकासाहेब पवार (Kakasaheb Pawar) व सुलक्षणा पवार यांची कन्या ऐश्वर्या सोबत राहुल आवारेंचा पुण्यात शानदार विवाहसोहळा पार पडला. (DYSP Rahul Aaware Wedding) या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी वधू-वरास आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. (NCP president Sharad Pawar, MP Supriya Sule, former minister Ram Shinde and former MLA Bhimrao Dhonde were present at the wedding ceremony of international wrestler Rahul Aware and congratulated the bride and groom) यावेळी राहुल आवारे यांचे वडिल बाळासाहेब आवारे व शारदा आवारे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.