मोदी सरकारचे मंत्री बावचळले : शेतकऱ्यांना ‘मवाली’ म्हणू लागले

केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांचे वादग्रस्त वक्तव्य

दिल्ली :  केेेंद्र सरकारने गतवर्षी काढलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करत गेली ८ महिने दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे कृषी आंदोलन सुरू आहे. देशभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे.अहिंसात्मक आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी ‘मवाली’ या शब्दात हिणवलं आहे. “यांना शेतकरी म्हणू नका, हे तर मवाली आहेत” असं वक्तव्य त्यांनी केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे त्या आता नव्या वादाला तोंड फुुटले आहे.

शेतकऱ्यांचे ही कृत्य गुन्हेगारी कृत्य आहेत. याची दखल घेतली पाहिजे, २६ जानेवारीला जे काही झाले होते ते वाईट होते, त्यांना विरोधी पक्षांकडून प्रोत्साहन दिले गेले. अशा या मीनाक्षी लेखिंच्या विधानावर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

किसान युनियन चे नेते राकेश टिकैत यांनी लेखींच्या या वक्तव्याला शांतपणे प्रतिक्रिया दिली आहे की, “मवाली नाही, शेतकरी आहेत”. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर देखील या वादग्रस्त विधानावरून संताप व्यक्त केला जातोय. ‘त्यांनी माफी मागावी’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होतोय.

त्यावर मीनाक्षी यांनी स्पष्टीकरण देत म्हणल्या की, माझं वक्तव्य हे, २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेप्रकरणी होते. यावरुन मवाली हा शब्द मी वापरला. माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर, मी माझं वक्तव्य मागे घेते.

गेले ८ महिने हे आंदोलन सुरू आहे.मात्र अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. आजपासून राजधानी दिल्लीमध्ये किसान संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या साठी शेतकरी हे जंतरमंतर येथे दाखल झाले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आजपासून ९ ऑगस्ट पर्यंत फक्त २०० शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यांच्या सोबत दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.