(Cheating on 57 girls ) बाबो..ऐकावं ते नवलच : त्याचं वय अवघं 27 अन त्याने केली 57 जणींची फसवणूक

फसवणूकीचा पसारा मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत

पुणे : सध्या लग्नाळू पोरांना वधु मिळणे अवघड झाले आहे. वधूच्या शोधासाठी मुलाकडचे मंडळी शोधाशोध करून करून थकत आहेत. पण यश काही येत नाही. अशी राज्यातील सध्याची स्थिती आहे. एकिकडे अशी परिस्थिती असताना आता या परिस्थितीच्या उलटे एक प्रकरण प्रकाशझोतात आले आहे. एका पठ्ठ्याने चक्क चौघींसोबत संसार तर थाटलाच शिवाय तब्बल 53 जणींना आपल्या जाळ्यात ओढण्याची करामत केली आहे.या भामट्याला पुणे पोलिसांनी थेट औरंगाबादेत जावून बेड्या ठोकल्या. अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. (Yogesh Gaikwad arrested by Pune police for cheating on 57 girls)

कोण आहे हा लखोबा ?

योगेश दत्तु गायकवाड (वय.27,रा. डोंगरगाव,ता.कन्नड) असे या अटक केलेल्या ठगाचे नाव आहे.बारावी नापास असलेल्या योगेशचा थाट हा सैन्य दलातील एखाद्या बड्या अधिकार्‍यासारखा असायचा. त्याच जोरावरच त्याने चौघींना फसवुन चार वेगवेगळे संसार थाटले.  त्याचबरोबर 53 तरुणींना जाळ्यात ओढून त्यांना ही फसवण्याचा डाव रचला होता अशी बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. (Yogesh Gaikwad arrested by Pune police for cheating on 57 girls)

Cheating on 57 girls

पुण्यातील तरुणीच्या कुटुंबियांना संशय आला अन..

पुण्यातील एका तरुणीला जाळ्यात खेचून त्याने लग्न केले. त्यानंतर तिला व तिच्या घरच्यांना विश्वासात घेऊन नात्यातील आणि गावातील तरुणांना सैन्य दलात नोकरी लावण्याच्या आमिषाने त्याने 50 लाखांचा गंडा घातला होता. त्यानंतर तो कर्तव्यावर जात असल्याचे सांगून निघून गेला होता. संशय आल्यामुळे घरच्यांनी त्याची माहिती गोळा केली तेव्हा त्याचे बिंग फुटले. गायकवाडने आतापर्यंत 40 ते 45 तरुणांना नोकरीच्या आमिषाने 50 लाखापेक्षा अधिक रूपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Yogesh Gaikwad arrested by Pune police for cheating on 57 girls)

लखोबाचे अहमदनगर कनेक्शन

योगेश गायकवाड याने फसवणुकीचे उद्योग करताना अहमदनगरच्या केडगावमधील संजय ज्ञानबा शिंदे (रा. केडगाव, जि. अहमदनगर) या साथीदाराची मदत घेतली होती. शिंदे याला देखील अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून सैन्य दलातील जवानांची वर्दी, एक चारचाकी गाडी, दोन दुचाकी असा 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

बसस्टॉपवर आधारकार्ड पडले अन तरूणी अडकली जाळ्यात

आळंदी देवाची येथे राहणाऱ्या तरुणीने पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यात तिने म्हटले आहे की, जानेवारी 2020 मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका हॉस्पिटलमध्ये ती आली होती.त्यावेळी पीएमपी बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरुणीला सापडले. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये  असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तरुणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणीच्या गावातील तरुणांचा विश्वास संपादित करून योगेशने आतापर्यंत 53 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या बद्दल तक्रार आल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. या तपासानंतर पोलिसांनी आरोपी योगेश व त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या. (Yogesh Gaikwad arrested by Pune police for cheating on 57 girls)

असा सापडला योगेश

आळंदी देवाची येथील तरुणी व तिच्या घरच्यांना फसवल्यानंतर आरोपी गायकवाड हा धमकी देऊन पसार झाला होता. याच कालावधीत त्याने औरंगाबाद येथील एका तरुणीला जाळ्यात खेचून संसार सुरू केला होता. पोलिस त्याच्या पहिल्या संपर्क क्रमांकावरून माग काढत होते. त्याच्या एका घराचा पत्ता मिळाल्यानंतर त्याने ते घर बदलले होते. दहा ते बारा ठिकाणी तो फिरला होता. औरंगाबाद येथील सिडको परिसरात तो वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे, यांच्या सुचनेनुसार  पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर कर्मचारी तात्या देवकते, अमित पुजारी, सतीश मोरे, दिपक लोधा,तानाजी सागर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. (Yogesh Gaikwad arrested by Pune police for cheating on 57 girls)

योगेश  तरूणीना असा ओढायचा जाळ्यात

पुणे शहरातील विविध भागांत योगेश फिरत असे. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून विश्वास वाढवून त्यांचा मोबाईल नंबर घ्यायचा. त्याशिवाय व्हॉट्स ऍप, विविध अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे ओळख वाढवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवित होता. त्यांच्या कुटुंबातील मुलाला लष्करात भरती करण्याच्या आमिषाने दोन ते तीन लाख रुपये घेऊन पळून जात असे. त्याने आतापर्यंत चार तरुणींसोबत खोटे लग्न करूनत्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तर, 53 तरूणींची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.अशी माहिती बिबवेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांनी दिली.