जात पंचायतीचा जाच, पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना उघडकीस, जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावत कुटुंबाला केले जातीतून बहिष्कृत, राज्यात उडाली खळबळ, 23 जणांविरोधात गुन्हे दाखल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुरोगामी महाराष्ट्रात जात पंचायतीच्या जाचाच्या घटना सातत्याने घडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी अशीच एक धक्कादायक उघडकीस आली आहे. लेकीला नांदवण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळीविरोधात पोलिसांत तक्रार करणाऱ्या एका कुटूंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावत डवरी गोसावी (Dwari Gosavi) जातीतून बहिष्कृत करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी 23 जणांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. जात पंचायतीच्या जाचाची ही घटना जामखेड तालुक्यातून उघडकीस आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

Jat Panchayat News,Jat panchayat imposed fine of three lakhs and Dawari Gosavi cast family ostracized them , 23 cases were filed against, jamkhed Crime News Today, An incident that shook progressive Maharashtra,

जामखेडच्या आरोळेवस्ता येथे राहणाऱ्या मोहन भगवान चव्हाण वय-50 यांच्या पुजा या मुलीचा सासवड येथील रमेश साहेबराव शिदें या तरूणाशी 2018 रोजी विवाह झाला होता. दोन वर्षे नांदवल्यानंतर पुजा हिला सासरच्या मंडळींनी 2020 साली माहेरी आणून सोडले होते. त्यामुळे मोहन चव्हाण व तिच्या कुटुंबियांनी पुजा हिच्या सासरच्या मंडळींची वारंवार समजुत काढली परंतू त्यांनी तिला नांदवण्यास नेले नाही. यामुळे मोहन चव्हाण यांनी भरोसा सेल कडे तक्रार दाखल केली होती. परंतू त्यानंतर पुजा हिच्या सासरच्या मंडळींनी सदरचे प्रकरण जात पंचायत बसवून मिटवू असे सांगितले. जात पंचायतीत मुलीला न्याय देण्याऐवजी जात पंचायतीने मुलीच्या कुटूंबाला तीन लाखाचा दंड ठोठावत कुटुंबाला डवरी गोसावी जातीतून बहिष्कृत करण्याचा निर्णय दिला. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानुसार मोहन भगवान चव्हाण वय-50 वर्षे रा जामखेड यांच्या फिर्यादीवरून 1) राजाराम सखाराम शिंदे, 2) बाबुराव राघु शिंदे, 3) शिवाजी भिवाजी शिंदे 4) हरीचंद्र बाबुराव शिंदे सर्व रा. यवत ता दौण्ड 5) साहेबराव भिवाजी शिदें 6) बाबाजी पिराजी आहेर 7) लखन साहेबराव शिदें सर्व सासवड ता पुरदंर जि पुणे 8) अनिल भिवाजी सांवत 9 ) भिवाजी नाना सांवत 10) बाबुराव तात्या चव्हाण 11 ) शंकर भयरु सावंत 12) शामराव भिमराव चव्हाण रा पाटस ता दौड जि पुणे 13) भगवान शंकर शिंदे रा काष्टी जि अ. नगर 14 ) रुपचंद दतात्रय सांवत 15) संजय दगडु सांवत रा पेडगाव रोड ता. श्रींगोदा जि अ. नगर 16) नाथा नारायन बाबर रा. दांडीनिमगाव सुरेश नगर ता नेवासा जि अ.नगर 17 ) पिराजी राजाराम शिंदे 18 ) शिवराम भयरु सांवत 19) दया दादाराव सांवतु रा नाथनगर सोनाई जि अ.नगर 20 ) चिमाजी गंगाधर शेगर रा.पळसदेव ता. इंदापुर जि.पुणे 21) बाबाजी भगवान शिदें रा. चांदा. ता.नेवासा जि.अहमदनगर, 22) प्रकाश एकनाथ सावंत रा. खडकी ता. दौण्ड जि. पुणे, 23) बापु बाबुराव शिदें रा.घोडेगाव ता नेवासा यांच्याविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व आरोपी फरार आहेत.

जामखेड पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नेमकं काय म्हटलयं? पाहूयात

फिर्यादी मोहन भगवान चव्हाण वय-50 वर्षे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले की, माझी मुलगी पुजा रमेश शिदें हीचे रमेश साहेबराव शिदें रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे यांचे सोबत दि. 09/05/2018 रोजी लग्न झालेले आहे. माझी मुलगी पुजा व तीचे पती, सासु, सासरे याचे घरगुती कारणावरुन नेहमी भांडण होत असल्याने माझी मुलगी पुजा हीस तीचे पती रमेश, सासु व सासरे यांनी सन 2020 साली आमचे घरी जामखेड ता. जामखेड जि.अहमदनगर येथे आणून सोडले होते. आम्ही मुलीचे पती, सासरे, सासु यांची वेळोवेळी समजु काढण्याचा प्रयत्न केला परतु ते ऐकण्याचे परीस्थीतीत नव्हते. त्यामुळे मी भरोसा सेल कर्जत ता. कर्जत येथे तक्रार दिली होती.

माझ्या मुलीचे पती, सासरे,व सासु यांनी आम्हाला सांगितले कि, आपण आपली जातपंचायत बसवु व आपले आपसातील वाद मिटवुन घेवु. त्यांनतर आम्ही मुलगी पुजा हिस नांदवण्यासाठी घेवुन जावु असे सांगितले होते. त्यांनतर माझे मामा राजराम सखाराम शिंदे रा. यवत ता. दौण्ड जि. पुणे हे आमचे घरी आले व त्यांनी मला सागितले की आपण दि.04 एप्रील 2023 रोजी भवरवाडी ता.जामखेड जि. अहमदनगर येथे जातपंचायत बसवणार असुन सदरचे जातपंचायतमध्ये आपण तुमचा वाद मिटवुन घेवु असे सांगितले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, मला जात पंचायत मध्ये जायचे नाही मी पोलीस स्टेशन किंवा कोर्टात न्याय मागेल त्यावर त्यांनी मला सांगितले की,आपले जातीमध्ये पोलीस स्टेशनला जात नाहीत, आम्ही जातपंचायतमध्ये निवाडा करतो. तुला जात पंचायतला यावे लागेल, नाहीतर तुला जातीतुन काढुन टाकु.

माझे मामा यांनी वरील प्रमाणे सांगितल्याने सदरचे जातपंचायतसाठी मी, माझी मुलगी पुजा रमेश शिदें, वडील भगवान शंकर चव्हाण, पत्नी कमल मोहन चव्हाण असे आम्ही दि.04 एप्रिल 2023 रोजी भवरवाडी ता. जामखेड येथे फॉरेस्टजवळ जात पंचायतसाठी गेलो होतो. त्यावेळी तेथे पुढील प्रमाणे पंच व त्याचे सहकारी होते. 1) राजाराम सखाराम शिदें 2) बाबुराव राघु शिदें 3) शिवाजी भिवाजी शिदें 4) हरीचंद्र बाबुराव शिंदे सर्व रा. यवत ता दौण्ड 5) साहेबराव भिवाजी शिदें 6) बाबाजी पिराजी आहेर 7 ) लखन साहेबराव शिदें सर्व सासवड ता पुरदंर जि पुणे 8) अनिल भिवाजी सांवत 9 ) भिवाजी नाना सांवत 10) बाबुराव तात्या चव्हाण 11 ) शंकर भयरु सावंत 12) शामराव भिमराव चव्हाण रा पाटस ता दौड जि पुणे 13) भगवान शंकर शिंदे रा काष्टी जि अ. नगर 14 ) रुपचंद दतात्रय सांवत 15) संजय दगडु सांवत रा पेडगाव रोड ता. श्रींगोदा जि अ. नगर 16) नाथा नारायन बाबर रा. दांडीनिमगाव सुरेश नगर ता नेवासा जि अ.नगर 17 ) पिराजी राजाराम शिंदे 18 ) शिवराम भयरु सांवत 19) दया दादाराव सांवतु रा नाथनगर सोनाई जि अ.नगर 20 ) चिमाजी गंगाधर शेगर रा. पळसदेव ता. इंदापुर जि.पुणे 21 ) बाबाजी भगवान शिदें रा. चांदा. ता.नेवासा जि.अहमदनगर 22 ) प्रकाश एकनाथ सावंत रा. खडकी ता. दौण्ड जि. पुणे 23. बापु बाबुराव शिदें रा. घोडेगाव ता नेवासा असे हजर होते.

वर नमुद सर्व पंचानी भवरवाडी ता. जामखेड येथे फॉरेस्टजवळ जातपंचायत बसवली. सदरचे पंचायत मध्ये मला तु पोलीस स्टेशन येथे का गेला? आपले समाजात पोलीस स्टेशन येथे जात नाहीत, तु पोलीस स्टेशन ला का गेला? असे म्हणुन मला सदरचे जातपंचायतमध्ये तु पोलीस स्टेशनला का गेला असे म्हणुन मला तीन लाख रुपये दंड दे, जर तु दंड भरला नाही तर आम्ही तुला जातीतुन बहीष्कृत करु असे सांगितले. त्यानतर मी त्यांना म्हणालो की माझे मुलीवरच अन्याय झालेला आहे. मी सदरचा दंड भरणार नाही. मला जातपंचायतचा निकाल मान्य नाही असे सांगीतले असता मला वरील लोकांनी जातीतुन बहीष्कृत करुन मला तीन लाखाचा दंड केला आहे. तसेच मी जर दंड भरला नाही तर मला व माझे कुटुबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.

तसेच माझे मामा नारायण अर्जुन सावंत रा. भवरवाडी ता. जामखेड याची मुलगी पुजा राहुल शिदें हीस पण तीचे सासरकडील लोक त्रास देत असल्याने त्यांना पण वरील लोकांनी दि.03.04.2023 रोजी भवरवाडी ता. जामखेड फॉरेस्टजवळ वर नमुद पंचानी जातपंचायतला बोलावुन घेवुन सदरचे पंचायतमध्ये आमचे नातेवाईक नारायण अर्जुन सावंत यांना पण वरील पंचांनी तुझे मुलीने पोलीस स्टेशन येथे तक्रार का दिली ? आपले समाजात पोलीस स्टेशन येथे जात नाहीत असे म्हणुन त्यांना पण वरील जातपंचायतमध्ये नमुद पंचानी पाच लाख रुपये दंड देवुन जातीतुन बहीष्कृत केल्याचे मला माहीती मिळाली आहे.

तरी दि.04.04.2023 रोजी सकाळी 10.00 वा चे सुमा. भवरवाडी ता. जामखेड येथे फॉरेस्टजवळ जातपंचायत बोलावुन घेवुन यातील वर नमुद आरोपीत मजकुर यांनी मला आपले समाजात पोलीस स्टेशन येथे जात नाहीत तु पोलीस स्टेशन ला का गेला? असे म्हणुन मला तीन लाख रुपये दंड करुन जर मी दंड भरला नाही तर मला जातीतुन बहीष्कृत करु अशी धमकी दिली. त्यानतर मी वर नमुद पंचाना म्हणालो की माझेच मुलीवर अन्याय झालेला असुन तुम्ही मला दंड केला आहे. मी दंड भरणार नाही मला जातपंचायतचा निकाल मान्य नाही असे सांगीतले असता मला वरील लोकांनी जातीतुन बहीष्कृत करुन मला तीन लाखाचा दंड केला आहे. तसेच मी जर दंड भरला नाही तर मला जीवे तसेच माझे कुटुबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सदर घटना एप्रिल 2023 मध्ये घडली होती. या प्रकरणी जात पंचायतीच्या पंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात 5 जूलै 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.

“थोर संत आणि महापुरूषांची महाराष्ट्र ही भूमी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आपण राहतो. परंतू जात पंचायतीचे प्रकार घडत आहेत. अश्या घटना रोखण्यासाठी सरकारने कायदा बनवलेला आहे. जात पंचायतीचा कोणालाही जाच सहन करण्याची आवश्यकता नाही. कायद्याच्या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही. ज्या कुटुंबांना जात पंचायती त्रास देत असतील त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, निष्ठूर जात पंचायतींना कायद्याचा हिसका दाखवून देऊ, कोणत्याही जात पंचायतीने विनाकारण अन्याय केल्यास त्यांना सोडणार नाही, असा इशारा जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिला आहे.”