Jamkhed Police Raid : हातभट्टीचा अड्डा उध्वस्त,अरणगाव शिवारात पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची संयुक्त कारवाई 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातभट्टीचे अड्डे सक्रीय असून हि गावठी दारू चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे. पोलिसांकडून यावर वारंवार कारवाया (Jamkhed Police Raid) होत असल्या तरी काही जणांकडून गावठी हातभट्टीची दारू बनवण्याचे प्रकार सुरूच आहेत. असाच एक प्रकार जामखेड तालुक्यातील अरणगाव शिवारातून समोर आला आहे.
पोलिसांनी टाकलेल्या धाडीत (Jamkhed Police Raid) गावठी हातभट्टी बनवण्याचा अड्डा उध्वस्त करण्यात आला असून त्या ठिकाणचे सर्व रसायन आणि इतर साहित्य नष्ट करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (Local Crime Investigation Department) संयुक्तपणे बुधवारी पार पाडली.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील गहिनीनाथ बापु पवार हा इसम अरणगाव शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचा अड्डा चालवत असून तो त्याच ठिकाणी गावठी दारूची विक्री करतो अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानंतर बुधवारी दि ०४ ऑगस्ट रोजी जामखेड पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तपणे अरणगावमध्ये धाड टाकली. (Jamkhed Police Raid)

 

या धाडीत सुमारे ४१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करत जागेवर नष्ट केला. यामध्ये ४० हजार रूपये किमतीचे कच्चे रसायन तर ०१ हजार पाचशे रूपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारूचा साठा नष्ट करण्यात आला. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस काँस्टेबल रोहित मिसाळ यांनी आरोपी गहिनीनाथ पवार याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. (Jamkhed Police Raid)

या कारवाईच्या पथकात पोलिस हेड कॉन्स्टेबल बबन मखरे, पोलिस नाईक सचिन आडवल, प्रकाश वाघ, पोलिस काँस्टेबल सागर सुलाने, रोहिदास नवगिरे, संभाजी कोतकर, पोलिस नाईक अजय साठे, पोलिस काँस्टेबल बाळू खाडे सह आदींचा समावेश होता. जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अजय साठे हे पुढील तपास करत आहेत. (Jamkhed Police Raid)