Jamkhed police raid gambling den | जुगार अड्ड्यावर जामखेड पोलिसांचा छापा; 05 लाखांचा मुद्देमाल जप्त !

15 जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | सत्तार शेख | Jamkhed police raid gambling den | जामखेड पोलिसांच्या पथकाने जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा जुगार अड्डा उध्वस्त केला आहे. पोलिसांनी भल्या पहाटे जुगार अड्ड्यावर धाड टाकत सुमारे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्याची धडाकेबाज कारवाई केली आहे.या प्रकरणी 15 जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई 17 रोजी पहाटे जामखेड तालुक्यातील वंजारवाडी शिवारात करण्यात आली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील एका ऊसाच्या शेतात जुगार अड्डा सुरू असल्याची बातमी जामखेड पोलिसांना मिळाली होती. जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने 17 रोजी वंजारवाडी शिवारातील एका ऊसाच्या शेतात छापेमारी केली.

याठिकाणी ऊसाच्या शेतात झोपडी बांधून जुगार अड्डा चालवला जात होता. या छाप्यात चार मोटारसायकली, एक झायालो गाडी तसेच रोख 01 लाख 06 हजार रुपये असा एकूण 05 लाख 35 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. येथील जुगार अड्ड्यावर विनापरवाना तिरट नावाचा जुगार खेळला जायचा.पोलिस काँस्टेबल संदिप आजबे यांच्या फिर्यादीवरून 15 जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अ  प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Jamkhed police raid gambling den)

या 15 जुगाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल

1) दादा लक्ष्मण ईपार रा वंजारवाडी
2) बाळासाहेब हरी भाऊ साठे रा जवळके
3) घनश्याम कैलास डोके रा खर्डा
4) हनुमंत उत्तम देवकर रा रत्नापूर तालुका परांडा
5) अजय बबन साठे रा रत्नपुर तालुका परंडा
6) राजेंद्र उद्धव डहाळे रा तरडगाव
7) रामा जानू आव्हाड रा वंजारवाडी
8) महादेव लक्ष्‍मण शेतकर रा वंजारवाडी
9) संभाजी सिताराम कराड रा वंजारवाडी
10) संदीप भीमा भोसले रा वंजारवाडी
11)  हर्षद नजमो शेख रा धनेगाव
12) किरण मुकुंद गोलेकर रा खर्डा
13) महेश शहाजी काळे रा धनेगाव
14) प्रकाश रामकृष्ण गोलेकर रा खर्डा
15) योगेश अण्णा सुरवसे रा खर्डा ता जामखेड

जामखेड पोलिसांनी वंजारवाडीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर केलेल्या छापेमारी एकुण 05 लाख 35 हजार 200 रूपयांची मुद्हदेमाल हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलिस नाईक संभाजी शेंडे हे करत आहेत. (Jamkhed police raid gambling den)

ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली या पथकात पोलीस उप निरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईकअविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, आबासाहेब आवारे,संग्राम जाधव,अरूण पवार, संभाजी शेंडे, बिराजदार सह आदींचा समावेश होता. (Jamkhed police raid gambling den)