जामखेड पोलीस | अवघ्या २४ तासात चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस

पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात चोरीच्या अन घरफोडीच्या घटना वाढत असतानाच हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कंबर कसलेल्या जामखेड पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासात चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई पार पडली आहे.

जामखेड तालुक्यातील साकत शिवारात असलेल्या पवनचक्कीच्या कंट्रोलरूम परीसरातून अज्ञात चोरटयांनी स्वत:चे अर्थिक फायद्याकरीता वेगवेगळया कंपनीच्या केबल्स व सीटी मोड्युल चोरून नेले होते. या गुन्ह्याची फिर्याद दाखल होताच जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने वेगाने तपास हाती घेत अवघ्या २४ तासात ०४ चोरटे जेरबंद केले आहेत.

काय होती फिर्याद ?

फिर्यादी भुषण युवराज मांडेवाड वय -३४ वर्ष धंदा-नोकरी,(ज्युनियर इंजिनियर ,व्हिक्ट्रीविंड फार्म सर्विसेस प्रा.लि.)रा.प्लॉट नं.३१ ,गट नं.२५० ,रामेश्वर कॉलणी,मेहरून,जळगाव जि.जळगाव यांनी जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की,दिनांक ०७ जुलै २०२१ ते ०९ जुलै २०२१ च्या दरम्यान व्हिक्ट्रीविंड फार्म सर्विसेस प्रा.लि.या कंपनीचे साकत शिवारात ता.जामखेड येथे पवनचक्कीचे कंट्रोलरूम आहे. या कंट्रोलरूम मधुन कोणीतरी अज्ञात चोरटयांनी स्वत:चे अर्थिक फायद्याकरीता वेगवेगळया कंपनीच्या केबल्स व सीटी मोड्युल चोरून नेले आहे.या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.I ३३०/२०२१ भादवि कलम ३८०, ४२७ प्रमाणे दिनांक १८ जुलै २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामखेड पोलीस
जामखेड पोलिसांच्या गुन्हा शोध पथकाने अवघ्या २४ तासात ०४ चोरटे जेरबंद केले

गुन्हा शोध पथकाने असा लावला छडा

सदर गुन्ह्याचा तपास श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक जामखेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते.गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक थोरात व गुन्हे शोध पथकाने चोरी करणा-या टोळीची खात्रीलायक बातमी मिळाली की,सदर घडलेला गुन्हा महेंद्र विष्णु पवार वय – २३ वर्ष त्याचे घरी जावुन घरझडती घेतली असता त्याचे घरातुन ३५ किलो सोललेल्या केबलमधील तांब्याची तार किंमत अंदाजे ३५  हजार मिळुन आली त्याच्याकडे तेथेच चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करून इतर आरेापीची नावे बालाजी बापु काळे वय-२१  वर्ष , रमेश अशोक शिंदे वय -३८  वर्ष ,उमेश बलभिम काळे वय- २१ वर्ष सर्व रा.आरोळे वस्ती,जामखेड ता.जामखेड जि.अहमदनगर असे सांगितले.

सदर आरोपी यांच्यावर सापळा रचुन त्यांना पकडण्यात गुन्हे शोध पथक जामखेड यांना यश आले. सर्व आरोपींना ताब्यात घेवुन तपासादरम्यान सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयात चोरीस गेलेला इतर मुद्देमालापैकी 66 हजार रूपये किंमतीचे तांब्याची तार काढुन घेतली सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत.

अट्टल चोर गजाआड

सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करण्यास व मुद्देमाल हस्तगत करण्यास जामखेड पोलीसांना यश आले आहे.मुख्य आरोपी बालाजी ऊर्फ दादा बापु काळे वय २१ वर्ष रा.आरोळे वस्ती ,जामखेड ता.जामखेड याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.तसेच त्यांनी आणखी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता नाकारता येत नसुन अधिक तपास पोलीस करत आहोत.
1) भुम पोलीस स्टेशन जि.उस्मानाबाद गु.र.नं.I ७९/२०१६ भादवि कलम ४५७,३८०,४११
2) भुम पोलीस स्टेशन जि.उस्मानाबाद गु.र.नं.I ८१ /२०१६  भादवि कलम ४५७ ,३८०
3) जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.I १७५ /२०१७ भादवि कलम ४५४,४५७,३८०,
4) जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. I २१ /२०१४ भादवि कलम ३७६,५०६

या पथकाने केली कारवाई

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब , मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब , यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड , पोसई राजु थोरात ,पोकॉ.अविनाश ढेरे, पोकॉ.संग्राम जाधव ,पोकॉ.संदिप राऊत ,पोकॉ. विजय कोळी, पोकॉ.आबा आवारे ,पोकॉ.अरूण पवार ,पोकॉ.सचिन देवढे यांनी केली आहे .