Jamkhed News | सुनंदाताई पवार यांच्या हस्ते डाळमिलचे उद्घाटन संपन्न !

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed News | जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे उभारण्यात आलेल्या दाळ मिलचे उद्घाटन आज संपन्न झाले.

आमदार रोहित पवार, कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्था, शारदा महिला संघ बारामती यांच्या प्रयत्नातून बांधखडक येथील वनवेवस्ती येथे उभारण्यात आलेल्या डाळमिलचे सुनंदा ताई पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (Inauguration Dalmil Bandhakhadak Sunanda Pawar)

जामखेड तालुक्यातील महिलांच्या हाती रोजगार मिळावा यासाठी आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार ह्या महिला बचत गटांच्या माध्यमांतून जामखेड तालुक्यातील महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या गृहउद्योग आणि लघुउद्योगांना चालना देण्यासाठी महिलांना प्रशिक्षित करून रोजगार निर्मितीवर सध्या भर दिला जात आहे.

जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे महिला विकास बचत गटाची 17 मार्च 2020 ला स्थापना करण्यात आली होती. संबंधित बचत गटाला दाळमिल उभारणीसाठी 2.5 लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते.

दोन महिन्यात दाळमिल चे बांधकाम पुर्ण करण्यात आले. सध्या तूर, हरभरा, मुग, उडीद, वाटाणा या दाळींचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. बांधखडक येथील दहा महिलांनी एकत्रित येत हा उद्योग सुरू केला आहे.