- Advertisement -

Successful Leg Surgery | जामखेडच्या सतीशच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया;मिळाले नवे आयुष्य !

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :जामखेड येथील सतीश अप्पासाहेब माने (Satish Appasaheb Mane) या ३० वर्षीय युवकाला आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्याने नवे आयुष्य मिळाले आहे.सतीशचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. (Satish's successful leg surgery, got a new life)

अपघातावेळी सतीशच्या पायाला जबर दुखापत झाली असल्याने त्याच्या पायामध्ये रॉड बसवावा लागला. काही कालावधीनंतर जखम भरून येऊन बरी होणे अपेक्षित होते मात्र तसे होऊ शकले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी सतीशला सुरुवातीला अहमदनगर व नंतर पुणे येथील रुग्ण्यालयात दाखल केले. मात्र वेगवेगळे वैद्यकीय उपचार करूनही जखम भरून न आल्याने पायामध्ये विष तयार होऊन पाय पूर्ण निकामी होण्याची भीती निर्माण झाली.(Satish's successful leg surgery, got a new life)

माने कुटुंबातील सदस्यांनी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सतीशच्या उपचारासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. एक लाखापर्यंत उपचार खर्च डॉक्टरांनी सांगितला होता. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सतीशला पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले परंतु तेथे उपचार होऊनही सतीशच्या प्रकृतीत कुठलीही विशेष सुधारणा झाल्याचे दिसून आली नाही. (Satish’s successful leg surgery, got a new life)

सतीशच्या प्रकृतीचा आमदार रोहित पवार यांनी आढावा घेऊन तज्ञ डॉक्टरांचा सल्ल्याने सतीशला बारामती येथील भोईटे हॉस्पिटलमध्ये (Bhoite Hospital Baramati) दाखल करण्यात आले. दि. २४ जून रोजी सतीशवर डॉ. भंडारे यांनी स्किन ग्राफ्टींगची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.सतीशचा जो पाय कापावा लागणार होता, मात्र तसे करण्याची वेळ आली नाही. आता सतीश पूर्ण ठणठणीत बरा होऊन पूर्वीप्रमाणेच चालायला लागेल. सतीशला आता आयुष्य जगण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे. (Satish's successful leg surgery, got a new life)