Today’s Petrol Price | सहा महिन्यात फक्त 66 वेळा वाढले इंधनाचे दर ,आज पुन्हा पेट्रोल दरात वाढ

इंधनदरवाढीने सामान्य जनता निघाली होरपळून: मोदी सरकारची ऐतिहासिक कामगिरी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. (Today’s Petrol Price)

वाढती महागाई सामान्यांसाठी मोठं संकट बनत चालली आहे. किचनचं बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. इंधनदरवाढीने सामान्य जनता होरपळून गेली आहे. विरोधक महागाई विरोधात आवाज उठवत आहेत. तर सत्ताधारी समर्थक महागाईचे समर्थन करत आहेत. मात्र वाढत्या महागाईने सामान्य जनतेचं पुरतं कंबरडे मोडून गेले आहे. तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. Today’s Petrol Price डिझेलचे दर मात्र आज स्थिर राहिले आहेत.मोदी सरकारने मागील सहा महिन्यात तब्बल ६६ वेळा इंधन दरवाढ करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली (Historic achievement of Modi government Today  again petrol price hike) खरी पण ही कामगिरी आता थेट सामान्यांच्या मुळावर उठली आहे.(Today’s Petrol Price)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत आज झपाट्याने वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात ३०पैसे प्रति लीटर वाढ केली आहे. यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रती लीटर वाढलं असून आताचा दर १०१.८४ रुपये आहे. तर डिझेलचा दर ९७.४५ रुपये आहे. (Today’s Petrol Price)

मुंबईत रोज पेट्रोलचे भाव वाढत आहेत. आज पेट्रोलचा दार 107 रुपये 87 पैसे आहे कालच्या भावाच्या तुलनेनं सुमारे 30 पैश्यांची वाढ झाली आहे . त्यामुळे सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे . लोकल रेल्वे सामान्य माणसांना बंद आहेत त्यामुळे कामावर जाण्यासाठी रस्तेवाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे आणि त्यात रोजच वाढणारे पेट्रोल चे दार त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.(Today’s Petrol Price)

जुलै महिन्यात आतापर्यंत ०९ वेळा पेट्रोलचे दर वाढले आहेत. डिझेल ०५ वेळा महागलं असून एक वेळा स्वस्त झालं आहे. या अगोदर जून आणि मे महिन्यात पेट्रोल डिझेलचे तब्बल १६ वेळा वाढले आहे. ०४  मे पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आतापर्यंत पेट्रोल ११.४४  रुपये तर डिझेल ०९.१४ रुपयांनी वाढलं आहे.(Today’s Petrol Price)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. आज दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ३० पैशांनी महागले. डिझेलच्या दरात आज वाढ झालेली नाही. दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी १०१ रुपये ८४ पैसे आणि एक लिटर डिझेलसाठी ९७ रुपये ४५ पैसे मोजावे लागतील. (Today’s Petrol Price) Today’s Diesel Price 17 July 2021 Saturday

राजस्थानमधील गंगानगर आणि मध्यप्रदेशमधील अनुपपूर या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा दर देशात सर्वाधिक आहे. गंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११३ रुपये २१ पैसे आणि एक लिटर डिझेलचा दर १०३ रुपये १५ पैसे आहे. तर अनुपपूरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ११२ रुपये ७८ पैसे आणि एक लिटर डिझेलचा दर १०१ रुपये १५ पैसे आहे (Today’s Petrol Price)

चार मोठ्या शहरांमधील पेट्रोल, डिझेलचा दर (Today’s Petrol Price -Diesel Price on 17 July 2021)

दिल्ली – पेट्रोल १०१.८४ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपये प्रतिलिटर
मुंबई – पेट्रोल १०७.८३ रुपये आणि डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.४९ रुपये आणि डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलिटर
कोलकाता – पेट्रोल १०२.०८ रुपये आणि डिझेल ९३.०२ रुपये प्रतिलिटर

 

“तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं”

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला (Modi Government) सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी याआधीही कोरोना व्हायरस, लस आणि विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर वाढत्या इंधन दरावरून हल्लाबोल केला. “तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं” अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली आहे.(Today’s Petrol Price)

 आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत”

“देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं अन्न देखील मिळत नाही. फक्त पेट्रोलचाच विचार करायचा झाला, तर अनेक राज्यांमध्ये पेट्रलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. गेल्या 6 महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास 66 वेळा वाढल्या आहेत. यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत आहे” असं सचिन पायलट (Congress Sachin Pilot) यांनी म्हटलं आहे. डेहराडूनमध्ये काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारवर (Modi Government)  निशाणा साधला.(Today’s Petrol Price)

आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत” अशा शब्दांत पायलट यांनी टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोलच्या किंमता सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोल दरवाढीचा महागाईवर परिणाम होत असल्याचं देखील पायलट यांनी सांगितलं आहे.Today’s Petrol Price