Beed Firing | गुन्हा मागे घे म्हणत तरूणाला गोळ्या घातल्या पण…
थरारक घटनेचं CCTV फुटेज आलं समोर; बीड जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ
बीड : जुन्या भांडणाच्या कारणावरून दाखल असलेला गुन्हा मागे घे असे म्हणत एका तरुणावर दोघा जणांनी गोळीबार (Firing in daylight) केल्याचा धक्कादायक प्रकार एका वायरल व्हिडीओच्या माध्यमांतून शनिवारी उघडकीस आला आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (beed Firing)
बीड जिल्ह्यातील (Beed District) मादळमोही या गावात (Madalmohi Village) शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला आहे. दैव बलवत्तर म्हणून गोळीबारात तरुण थोडक्यात बचावला. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच प्रकार त्या तरूणाच्या बाबतीत घडला आहे. त्या तरुणाचे प्राण वाचले आहेत. संपुर्ण घटना घटनास्थळी असलेल्या एका सीसीटीव्हीत कैद (Firing incident caught in CCTV) झाली असून तो व्हिडीओ आता सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे.(beed Firing)
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. त्या घटनेचा व्हिडीओ आज शनिवारी सकाळी समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. याप्रकरणी पवन गावडे या तरूणाच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (beed Firing)
मादळमोही येथील पवन गावडे या तरुणाचे हायवेलगत घर आणि येथेच बांधकाम साहित्याचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दुकानासमोर पवन गावडे हे थांबले असता त्याठिकाणी दोन तरुण मोटारसायकलवरुन आले. यानंतर जुन्या भांडणातून दाखल असलेला गुन्हा परत घे म्हणून गावडे यांच्याशी दोघांनी हुज्जत घालत त्यांच्या डोक्याला एका जणांनी पिस्तूल लावून गोळी झाडली. यावेळी गावडे यांनी सतर्कता दाखविल्याने गोळी डोक्याला चाटून गेली. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पवन गावडे यांच्या फिर्यादीवरून संजय पवार आणि अविनाश पवार या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (beed Firing)
viral video : भरदिवसा गोळीबार pic.twitter.com/HutCL8LgPs
— Jamkhed Times (@JamkhedTimes) July 17, 2021