कोणी कितीही गर्जना करा, यंदा अनुभवी नेत्यालाच जनता पाठबळ देणार – युवा नेते संभाजी कोल्हे यांचा दावा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी कितीही गर्जना केली तरी, यंदा राजुरीची सुज्ञ जनता अनुभवी नेत्यालाच पाठबळ देणार आहे. यंदाच्या निवडणुकीत माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते साहेबांचा करिष्मा चालणार आहे, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास युवा नेते संभाजी कोल्हे यांनी व्यक्त केला.

No matter how much someone shouts, this year the people will support the experienced leader only - claimed youth leader Sambhaji Kolhe,rajuri grampanchayat election 2022

जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेली राजुरी ग्रामपंचायतची निवडणुक यंदा अतिशय चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. यंदा राजुरीत थेेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी राजुरीत बैठकांना जोर आला आहे.

दरम्यान, राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते हे थेट जनतेतून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. 2007 ते 2017 या काळात काळदाते हे सलग दहा वर्षे गावचे सरपंच होते. यंदाच्या निवडणुकीतही काळदाते यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. सुभाष तात्या काळदाते साहेबांच्या नेतृत्वाखालील पॅनलला यंदा जनता मोठ्या मताधिक्याने विजयी करणार असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. जनता अनुभवी नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवणार आहे, अशी भूमिका युवा नेते संभाजी कोल्हे यांनी व्यक्त केली.

राजुरी, डोळेवाडी, घुलेवस्ती, एकबुर्जी, बांगरवस्ती या परिसराला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते साहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, काळदाते साहेबांनी सरपंच असताना गावचा जो विकास केला तो मधल्या काळात ठप्प झाला.परंतू आता गावाला विकासाच्या नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी राजुरी ग्रामपंचायतची सुज्ञ जनता काळदाते साहेबांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवणार आहे,असा विश्वास युवा नेते संभाजी कोल्हे यांनी व्यक्त केला.