बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या हस्ते दिलीप निमोणकर यांचा गौरव

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुका कृषी कार्यालयातील अनुरेखक दिलीप रामचंद्र निमोणकर हे 31ऑक्टोबर 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी कृषी विभागात 38 वर्षे यशस्वी सेवा बजावल्याबद्दल बीडचे जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या हस्ते निमोणकर यांचा जामखेडमध्ये गौरव करण्यात आला.

Dilip Nimonkar felicitated by Beed District Sessions Judge Satyawan Doke

सेवानिवृत्त कृषी अनुरेखक दिलीप निमोणकर हे लोकमतचे पत्रकार अशोक निमोणकर यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. जामखेड कृषी विभागात ते अनुरेखक म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले. रविवारी जामखेडमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी कृष्णा लटके, मंडल अधिकारी बाळासाहेब लटके, पत्रकार अशोक निमोणकर, संजय वारभोग, अविनाश बोधले, सुदाम वराट, सुरज निमोणकर, नासीर पठाण सह आदी उपस्थित होते.

जामखेड तालुका कृषी कार्यालयातील अनुरेखक दिलीप रामचंद्र निमोणकर यांनी पुणे, सोलापूर, नगर विभागात 38 वर्षे सेवा बजावली.अनुरेखक या हुद्द्याचे जामखेड कार्यालयात दोनच पद होती. कृषी क्षेत्रातील ज्ञानाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी आपल्या निवृत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प दिलीप निमोणकर यांनी केला आहे.