सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या खाकसारवली बाबांच्या ऊरूसास बुधवारपासून प्रारंभ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यभरातील सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील प्रसिद्ध सय्यदनूर खाकसारवली बाबांंच्या ऊरूसास बुधवार (ता.७) पासून प्रारंभ होत आहे.

Khaksaravali Baba Ooroos place of worship for all religions, will begin from Wednesday in javala

दिवंगत सय्यद बु-हानहबीब शाह यांच्या प्रेरणेने होत असलेला हा ऊरूस तीन दिवस साजरा होत आहे. बुधवारी (ता.७) पहिल्यादिवशी गुसूल, कुराण खानी, मिलाद हा कार्यक्रम पार पडणार आहे.यादिवशी कुराणाचे पठण करतानाच, खाकसारवलीबाबा यांची कबर व दर्गा शुध्द पाण्याने धूवून गुलाबपाणी व अत्तराने कबर स्वच्छ करून मानाचा गल्लब कबरेवर चढवला जातो.

गुरूवारी (ता.८) ऊरूसाचा मुख्य दिवस संदल कार्यक्रम आहे. दर्ग्याचे प्रतीक तयार करून, यादिवशी जवळा गावातून सवाद्य संदल मिरवणूक काढण्यात येते. संदल मिरवणूकीत गावातील तसेच बाहेर गावाहून आलेले सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. संदल मिरवणूकीनंतर दर्ग्याचे मुजावर कबरीची पुजा करून, फुलांची चादर कबरीवर चढविली जाते. त्यानंतर भाविकांना तबरुक (प्रसाद ) दिला जातो. यानंतर कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Khaksaravali Baba Ooroos place of worship for all religions, will begin from Wednesday in javala

तिस-यादिवशी शुक्रवारी (ता.९)  सर्व मुस्लीमबांधव तसेच अन्य धर्मीय लोक इच्छेनूसार  फुलांची चादर चढवतानाच, नेवैद्य वाहतात. यादिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या निमित्त दर्ग्या आणि परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Khaksaravali Baba Ooroos place of worship for all religions, will begin from Wednesday in javala

या ऊरूसामध्ये राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळा येथे नांदणी (कवतुका) नदी किनारी असलेला दर्ग्याचा परिसर नयनरम्य असल्याने, याठिकाणी कायमच आल्हाददायक वातावरण असते. दर्ग्याचे बांधकाम खूप जूने आहे. दरम्यान बांधकाम मोडकळीस आल्यानंतर सन १९८४ साली दिवंगत बु-हानहबीब शाह यांनी स्वयंस्फुर्तीने सुमारे दिड लाख रूपये खर्च करून दर्गा बांधला आणि त्याच वर्षापासून ऊरूस साजरा करण्यास सूरूवात केली.

Khaksaravali Baba Ooroos place of worship for all religions, will begin from Wednesday in javala

दिवंगत बु-हानहबीब शाह हेच प्रथमपासून या दर्ग्याची सेवा करत आले आहेत. त्यांचे १४ वर्षापुर्वी सन २००८ साली निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव सय्यद अमीन बु-हान शाह आणि सय्यद हमीद बु-हान शाह यांनी या दर्ग्याची सेवा करण्यास प्रारंभ केला आहे.