अहमदनगर जिल्ह्यात दहशत आणि दडपशाहीचे नवे राजकारण सुरू – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल

संगमनेर, जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात दहशत आणि दडपशाहीचा नवा पॅटर्न जन्माला आला आहे. गौण खनिज आणि वाळू उपशावरील कारवाईच्या नावाखाली दहशतीचे राजकारण केले जात आहे, याच माध्यमांतून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, काही मंडळींमुळे विकासाची कामे थांबली आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

new politics of terror and oppression is starting in Ahmednagar district, Senior Congress leader Balasaheb Thorat attacked Radhakrishn Vikhe Patil,

कोरोना काळात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याच्या विकासाला गतिमान ठेवले होते. विविध प्रकल्प आमच्या सरकारने मंजुर केले होते. नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या अनेक महत्त्वकांक्षी योजनांना स्थगिती दिली.तर जिल्ह्यातील काही मंडळींनी त्यापुढे जात आपल्या व्यक्तिगत राजकीय आकसापोटी जिल्हा नियोजनाच्या विकास कामांनासुद्धा स्थगिती दिली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे विकास कामे तसेच प्रगतीपथावर असणारे निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम ठप्प झाले असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

वाळू उपसा आणि गौण खनिज यावर कारवाईच्या नावाखाली काही जणांकडून राजकीय कारवाया करत कोट्यावधी रुपयांचे खोटे दंड ठोठावून, खोटे गुन्हे दाखल करत उद्योग व्यवसायिकांना वेठीस धरले जात आहे. या बेकायदेशीर कारवायांमुळे घरांची, रस्त्यांची तसेच सरकारी कामे सुद्धा बंद पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली असून अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

सध्या शिंदे फडणवीस सरकारच्या सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय कारवाया या येथील परंपरेला छेद देणाऱ्या आहेत. राजकारण करण्याच्या नादात संपूर्ण जिल्हाच काही मंडळींनी वेठीस धरला आहे. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे सोडून ते विकासकामे थांबवित असल्याचा आरोप आमदार थोरात यांनी केला.