जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या जाहीर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तीन ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या जाहीर करण्याची प्रकिया सुरु आहे.अगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आधी तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यास आमदार पवार विरूद्ध आमदार शिंदे असा थेट सामना या निवडणुकीत होताना दिसणार आहे.

Jamkhed, Ward wise voters list of Ratnapur, Rajuri, Shiur Gram Panchayat is published, Gram Panchayat election 2022,

जामखेड तालुक्यातील माहे डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 3 ग्रामपंचायतीच्या मतदार यादीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. आज 13 रोजी तालुक्यातील रत्नापूर, राजुरी व शिऊर या 3 ग्रामपंचायत च्या प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

रत्नापूर, राजुरी व शिऊर या 3 ग्रामपंचायतच्या प्रभागनिहाय मतदार याद्या आजपासून तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय,पंचायत समिती जामखेड आणि तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी बघण्यास उपलब्ध असणार आहेत.

या मतदार यादीवर कुणाला काही हरकत असल्यास 13 ते 18/10/2022 (दिनांक 16/10/2022 रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत तहसील कार्यालयात आपली हरकती दाखल कराव्यात.या मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.