जामखेड : मोटारसायकलला वाचविणे पडले महागात, इंडियन ऑईलचा टँकर उलटला, 24 हजार लीटर डिझेल-पेट्रोल वाया गेल्याची शक्यता, राजुरी गावातील घटना !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड – खर्डा रस्त्यावर डिझेलचा टँकर पल्टी होण्याची घटना घडली. मोटारसायकल स्वारांना वाचवण्याच्या नादात टँकरचा हा भीषण अपघात झाला. या अपघातात डिझेलची टाकी फुटली. यामुळे रस्त्यावर डिझेलचा पाट वाहत होता.डिझेल भरण्यासाठी नागरिकांची अपघातस्थळी झुंबड उडाली होती. ही घटना आज दुपारी राजुरी गावाजवळ घडली.

Jamkhed, Indian oil tanker overturned, 24 thousand liters of diesel-petrol was wasted,Incident at Rajuri,

अहमदनगरहून जामखेडमार्गे भूमच्या दिशेने इंडियन ऑईल कंपनीचा MH 16 BC 1314 हा बारा टायर टँकर भरधाव वेगाने निघाला होता. राजुरी गावाजवळ सदर टँकर आला असता, समोरून ओव्हरटेक करत येत असलेल्या दोन मोटारसायकलींना वाचवण्यासाठी टँकर चालकाने ब्रेक मारला, मात्र टँकरमध्ये मोठा लोड असल्याने टँकर पल्टी झाला.

टँकर पल्टी झाल्याने डिझेलची टाकी फुटली. या घटनेत लाखो रूपये किमतीचे 24 हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल वाहून गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.डिझेलची टाकी फुटल्याने रस्त्यावर डिझेलचा पाट वाहत होता. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांची डिझेल भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती.सदर घटनेत टँकर चालक जखमी झाला आहे.

Jamkhed, Indian oil tanker overturned, 24 thousand liters of diesel-petrol was wasted,Incident at Rajuri,

सदर घटनेची माहिती कळताच जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस काँस्टेबल सचिन सगर, सचिन देवढे, दिनेश गंगे, प्रविण पालवे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातस्थळी त्यांनी बचाव कार्य केले त्यांना पोलिस पाटील मोरे आणि स्थानिकांनी मदत केली. या अपघातात लाखो रूपये किमतीचे डिझेल आणि पेट्रोल वाया गेले.

Jamkhed, Indian oil tanker overturned, 24 thousand liters of diesel-petrol was wasted,Incident at Rajuri,

सायंकाळी 8 वाजेपर्यंत जामखेड पोलिसांत याबाबत कुठल्याही गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. पोलिस घटनास्‍थळी तळ ठोकून आहेत. अपघातग्रस्त टँकर हटविण्यासाठी जामखेड पोलिस पथक घटनास्‍थळी काम करत आहे.

Jamkhed, Indian oil tanker overturned, 24 thousand liters of diesel-petrol was wasted,Incident at Rajuri,