Corona’s havoc : जामखेड तालुक्यात शुक्रवारी आढळले 43 नवे रुग्ण

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा कहर (Corona’s havoc) सुरूच असून शुक्रवारी पुन्हा नव्या कोरोनाबाधीतांची तालुक्यात मोठी भर पडली आहे,शुक्रवारी दिवसभरात ४३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी दिवसभरात आरोग्य विभागाने एकूण ६७४ अँटीजन तपासण्या करण्यात आल्या. तर दिवसभरात ५०२ नागरिकांचे स्वॅबनमुने  RTPCR तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.(Corona’s havoc)

आज दिवसभरात आढळून आलेले रुग्ण खालील प्रमाणे

अँटीजन तपासणी अहवाल – जामखेड ०१,साकत ०२,वाघा ०१ ,पिंपळगाव उंडा ०१ ,  शिउर ०१, जवळा ०१ तेलंगशी ०१

 

RTPCR अहवाल जामखेड ०४, जायभायवाडी ०५,नान्नज ०१,वाघा ०३,शिउर ०२, डिसलेवाडी ०२, फक्राबाद ०१ ,कुसडगाव ०३ ,डोळेवाडी ०१, रत्नापुर ०२,जवळा ०१ ,खर्डा ०१, धोतरी ०४ ,जामवाडी ०४ ,धनेगाव ०१