17 August | विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर शाळा सुरू होणार

१७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोनामुळे शाळेपासून वंचित असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी शुक्रवारी समोर आली आहे. अखेर सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ ऑगस्टपासून (17 August) राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील सर्व शाळा लवकरच (17 August) सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक आहे. त्यात यावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यावर याची अंमलबजावणी होईल असेही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

01 ऑगस्टला ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत जारी झालेल्या नव्या  नियमावलीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आले आहेत. सध्या ०८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग (17 August) लवकरच सुरू होणार आहेत असेही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

मार्च २०२० (March 2020 ) पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते.