Shocking incident at Chumbhali : चुंभळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लटकवले फासावर ?
सामाजिक न्याय मंत्र्याच्या जिल्ह्यात महिला व मुलींची सुरक्षा आली ऐरणीवर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वेगाने वाढल्या आहेत. महिला व मुलींसाठी हा जिल्हा आता धोकादायक ठरू लागला आहे. सुर्डी व सिरसाळ्यातील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता चुंभळी Shocking incident at Chumbhali या गावातून तिसरी घटना समोर आली आहे. येथे १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून फासावर लटकवल्याची प्राथमिक तक्रार मयत मुलीच्या पित्याने दाखल केली आहे. यामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका १४ वर्षीय मुलीचा मृतदेह तिच्याच घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेतलेल्या अवस्थेतमध्ये आढळून आल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चुंबळी Shocking incident at Chumbhali या गावातून शुक्रवारी समोर आली आहे.अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मुलीच्या पित्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीवर बलात्कार करून तिला फासावर लटकवले गेल्याची तक्रार पाटोदा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. सध्या पोलिस वेगाने प्राथमिक तपास करत आहेत.Shocking incident at Chumbhali
मुलीच्या पित्याने मुलीवर अत्याचार करून तिला फासावर लटकवल्याची तक्रार दिल्याने हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. या प्रकरणातील धागेदोरे सखोलपणे तपासण्यासाठी पोलिसांनी मयत चिमुकलीचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्यावर अंबेजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहेत. Shocking incident at Chumbhali
मयत मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीत गावातील एका तरुणावर संशय व्यक्त केला आहे. तसेच या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आम्ही सर्वजण लग्नासाठी बाहेरगावी गेलो होतो. गुरूवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर मुलगी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.Shocking incident at Chumbhali
गावातील एका तरुणाकडून मयत मुलीसह तिच्या बहिणीची वारंवार छेड काढली जायची. यापूर्वीही त्या तरुणाने अश्लील चाळे केल्याचे समोर आले होते. गावातील नागरिकांनी त्याला समज दिली होती. त्यानंतरही तो तरुण मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. दिनांक 5 ऑगस्ट रोजी आम्ही लग्नासाठी बाहेरगावी गेल्याने घरात मुलगी एकटी होती या संधीचा फायदा घेऊन त्या तरुणाने मुलीवर अत्याचार करून तिला फासावर लटकवले असावे असा संशय मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. Shocking incident at Chumbhali
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही मुलीच्या पित्याने तक्रारीत केली आहे.Shocking incident at Chumbhali
दरम्यान या घटनेचे गांभीर्य पाहता मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आला आहे. याठिकाणी इन कॅमेरा शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयांमध्ये मयत मुलीचे इन कॅमेरा शवविच्छेदन दुपारी उशिरापर्यंत सुरू होते. तिच्यावर अत्याचार झाला का ? तिचा मृत्यू नेमका कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असून त्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.Shocking incident at Chumbhali
दरम्यान या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा बदनाम झाला आहे. चुबंळी गावातील वातावरण तणावपूर्ण आहे. बीडमध्ये महिला व मुलींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सामाजिक न्याय मंत्र्याच्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.Shocking incident at Chumbhali