ब्रेकिंग : जामखेड तालुक्यात वीज कोसळून म्हैस ठार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात गुरूवारी 13 रोजी अवकाळी पावसाने दणका दिला आहे. अचानक आलेल्या पावसात वीज कोसळण्याची घटना तालुक्यातील धामणगाव येथून समोर आली आहे. ही घटना आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Breaking, buffalo killed by lightning in Jamkhed taluka, dhamngaon, jamkhed news,

आज सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. दुपारपासून आकाशात ढगांची दाटी झाली होती. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास धामणगाव परिसरात अवकाळी पावसाने रिमझिम हजेरी लावली. याच सुमारास या भागात विजांचा मोठा कडकडाट सुरु होता.

धामणगाव येथील शेतकरी नवनाथ सर्जेराव गायकवाड यांच्या गट नंबर 194 मध्ये वीज कोसळण्याची घटना घडली. या घटनेत गायकवाड यांची झाडाखाली बांधलेली म्हैस जागेवर दगावली. नवनाथ सर्जेराव गायकवाड यांचे सुमारे एक लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, अशी माहिती सरपंच महारूद्र महारनवर यांनी दिली.

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे.या काळात होणारा पाऊस हा वीजांसह कोसळणार असल्याचाही अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पशुधनासह स्वता:ची काळजी घ्यावी, असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.