जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जामखेड शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. जामखेड शहर सार्वजनिक भीमजयंती महोत्सव समितीच्या वतीने ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांच्या क्रांतीकारी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जामखेडकरांना तुफान प्रतिसाद दिला.
जामखेड शहर सार्वजनिक भीमजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक मिलिंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे जामखेड बजारतळ येथे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जामखेडकरांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, विस्तार अधिकारी बापूराव माने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ घायतडक, निखिल घायतडक, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, भिमजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजन समिंदर सर, उपाध्यक्ष रवी सोनवणे, सचिव रजनीकांत मेघडंबर, सल्लागार सिध्दार्थ साळवे, डाॅ.सचिन घायतडक, सचिन सदाफुले राळेभात, मुकुंदराज सातपूते,जिल्हा सोसायटी अहमदनगर संचालिका ज्योतीताई पवार,प्रा.राहुल आहिरे सर,माजी सरपंच भरत आहेर,शिवाजी ससाणे, विनोद घायतडक सह आदी उपस्थित होते.