राजुरीत भाजपला बहुमत पण सरपंच राष्ट्रवादीचा, राजुरीकरांनी दिली भाजप आणि राष्ट्रवादीला समान संधी, अश्विनीताई कोल्हे बनल्या राजुरीच्या सरपंच !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्याचे लक्ष लागलेल्या राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले तर सरपंच राष्ट्रवादीचा झाला आहे. या निकालामुळे राजुरीकरांनी दोन्ही गटाला समसमान संधी दिल्याचे या निकालातून समोर आले. या निवडणुकीत विद्यमान सरपंच गणेश कोल्हे यांना पराभवाचा सामना करावा लागला. कोल्हे यांना नवख्या उमेदवाराने पराभवाची धुळ चारली.
राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी थेट जनतेतून निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपकडून माजी सरपंच सुभाष तात्या काळदाते यांच्या सौभाग्यवती वैशालीताई काळदाते विरूध्द राष्ट्रवादीचे सागर कोल्हे यांच्या पत्नी आश्विनीताई कोल्हे अशी लढत झाली. या लढतीत कोल्हे यांनी काळदाते यांचा 100 मतांनी पराभव केला.
राजुरीत सदस्यपदाच्या 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला पाच जागा मिळाल्या. यात भाजपचे बहुमत झाले. अतिशय चुरशीच्या निवडणुकीत राजुरीकरांनी भाजप आणि राष्ट्रवादीला समसमान संधी दिली. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने मारलेली मुसंडी लक्षवेधी ठरली आहे. चिठ्ठीने भाजपच्या एका उमेदवाराला साथ दिली. सरपंचपदाच्या उमेदवार अश्विनीताई कोल्हे यांनी तीनही प्रभागात आघाडी घेतली होती. सरपंचपदासाठी नोटाला 9 मते मिळाली तर सदस्यपदासाठी तीनही प्रभागात एकुण 70 मते नोटाला मिळाली.
राजुरीतील विजयी उमेदवार खालील प्रमाणे
सरपंचपदाचा निकाल खालीलप्रमाणे
सत्यभामा समाधान आंबेडकर – 46
वैशालीताई सुभाष काळदाते – 794
आश्विनी सागर कोल्हे – 894 (विजयी)
नोटा – 9
प्रभाग एक : नागरिकांचा मागास प्रवर्ग
1) गोविंद लक्ष्मण आंबेडकर – 37
2) गणेश श्रीराम कोल्हे – 330
3) विशाल अशोक चव्हाण 344
4) नोटा – 10
प्रभाग एक : सर्वसाधारण स्त्री
1) संगिता बाळू मोरे – 359 (विजयी)
2) वैशाली सुधीर सदाफुले – 339
3) संगिता सुनिल सदाफुले – 318
4) सुनिता मुकिंदा कोल्हे – 403 (विजयी)
5) नोटा – 18
6) नोटा – 05
प्रभाग दोन : सर्वसाधारण
1) भानुदास गोपीनाथ खाडे – 14
2) महादेव शिवदास खाडे – 87
3) सुरेश आश्रूबा खाडे – 145
4) बाबासाहेब रामदास घुले – 183 (विजयी)
5) नोटा – 3
प्रभाग 2 : नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
1) कुसुम रामदास खाडे – 181
2) किर्ती नानासाहेब खाडे – 236 (विजयी)
3) नोटा – 15
प्रभाग 2 : सर्वसाधारण स्त्री
1) मीनाक्षी संजय खाडे – 198 (विजयी)
2) विजूबाई ज्ञानदेव खाडे – 61
3) विजूबाई भास्कर घुले – 166
4) नोटा – 7
प्रभाग 3 : अनुसूचित जाती
1) सुरज सुनिल गायकवाड – 304 (विजयी)
2) जनार्धन रामभाऊ ससाणे – 278
3) नोटा – 8
प्रभाग 3 : सर्वसाधारण
1) समाधान सिताराम आंबेडकर – 25
2) गौतम आश्राजी फुंदे – 282 (चिठ्ठीवर विजयी)
3) मच्छिंद्र आश्रुबा फुंदे – 282
4) नोटा – 1
प्रभाग 3 : सर्वसाधारण स्त्री
1) संगिता शिवदास कोल्हे – 302 (विजयी)
2) उज्ज्वला बाळासाहेब मोरे – 285
3) नोटा – 3
प्रभाग तीनमध्ये चिठ्ठीचा कौल
प्रभाग तीनमधील सर्वसाधारण जागेवरचा निकाल लक्षवेधी ठरला. या ठिकाणी गौतम आश्राजी फुंदे आणि मच्छिंद्र आश्रुबा फुंदे या दोन्ही उमेदवारांना समसमान 282 मते मिळाली यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या उपस्थितीत चिठ्ठीचा कौल घेण्यात आला.श्रेया विजय भोरे या चिमुकल्या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये गौतम फुंदे हे विजयी ठरली. फुंदे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच राजुरीत भाजपला सदस्यपदात बहुमत मिळाले.
राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे
1)विशाल अशोक चव्हाण
2) संगिता बाळू मोरे
3) सुरज सुनिल गायकवाड
4) संगिता शिवदास कोल्हे
5) गौतम आश्राजी फुंदे
राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे
1) अश्विनीताई सागर कोल्हे (सरपंच)
2) सुनिता मुकिंदा कोल्हे
3) मीनाक्षी संजय खाडे
4) किर्ती नानासाहेब खाडे
5) बाबासाहेब रामदास घुले