मोठी बातमी : कर्जत – जामखेड मतदारसंघातील 58 वाड्यांसाठी पोलिस पाटील पदांची निर्मिती, प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांनी जारी केले आदेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ५८ वाड्यांना महसुल गावांचा दर्जा देऊन या गावांसाठी पोलिस पाटील पदांची निर्मिती करण्यात आली आहे, असे आदेश प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांनी जारी केले आहेत.

Big News, Creation of Police Patil posts for 58 revenue villages in Karjat-Jamkhed Constituency, Deputy Divisional Officer Dr. Ajit Thorbole issued orders

कर्जत तालुक्यातील ११८ गावापैकी ७८ गावात पोलीस पाटील पद हे मंजूर आहे. कर्जत तालुक्यातील ११८ गावापैकी नगरपंचायत हद्दीतील ०४ गांवे तसेच पोलीस स्टेशन ०३ कर्जत, मिरजगांव, आणि राशीन येथे पोलीस चौकी अशी एकुण ०७ गांवे वगळता उर्वरित एकुण १११ गावामध्ये पोलीस पाटील पदे आवश्यक आहेत. परंतु पूर्वीचे ७८ पदे अस्तित्वात असून नव्याने ३३ नवीन महसूली गावांना पोलीस पाटील पदनिर्मिती करावयाची आहे.

जामखेड तालुक्यात ८७ गावांपैकी ५२ गावात पोलीस पाटील पद हे मंजूर आहे. जामखेड तालुक्यातील ८७ गावापैकी नगरपंचायत हददीतील ०७ गांवे तसेच पोलीस स्टेशन ०३ जामखेड, खर्डा, आणि नान्नज येथे पोलीस चौकी अशी एकुण १० गांवे वगळता उर्वरित एकुण ७७ गावामध्ये पोलीस पाटील पदे आवश्यक आहेत. परंतु पूर्वीचे ५२ पदे अस्तित्वात असून नव्याने २५ नवीन महसूली गावांना पोलीस पाटील पदनिर्मिती करावयाची आहे.

कर्जत व जामखेड तालुक्यातील वाडीचे नवीन महसूल गावांत रुपांतरीत झाली असल्यामुळे सदरच्या गावांना पोलीस पाटील पद निर्माण करणेबाबत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम १९६७ तसेच शासन निर्णय क्र. बीव्हीपी ०२९९/सीआर- ५६ / पोल-८, दिनांक ७ सप्टेंबर १९९९ कलम ५ (१) पोलीस पाटलांची नेमणूक, त्यांचे पारिश्रमिक व सेवेच्या इतर शर्ती प्रमाणे पोलीस पाटील नवीन पद निर्मितीचे अधिकार उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना प्रदान करणेत आलेले आहेत.त्यानुसार कर्जत आणि जामखेड तालुक्यातील ५८ गावांसाठी पोलिस पाटील पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्ती, तसेच पोलीस यंत्रणेस गावातील शांतता, स्वास्थ बिघडू नये त्याविषयी मदत करणेसाठी कामकाजासाठी तसेच कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिपत्याखाली दिलेल्या कामकाजासाठी प्रत्येक गावात पोलीस पाटील पद असणे आवश्यक आहे. सदरचे नवीन महसूल गावात पोलीस पाटील पदाची निर्मिती करणे गरजेचे असल्याने कर्जत तालुक्यातील ३३ आणि जामखेड तालुक्यातील २५ महसूली गावांना पोलीस पाटील पद निर्मिती करण्यास प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले यांनी आदेश जारी केले आहेत.

कर्जत तालुका : वाडीचे नवीन महसूली गावांत रुपांतर झालेली गांवे खालीलप्रमाणे

  • बहिरोबावाडी
  • सोनाळवाडी
  • सुपेकरवाडी
  • नवसरवाडी
  • कापरेवाडी
  • कानगुडवाडी
  • मुळेवाडी
  • आनंदवाडी
  • बजरंगवाडी
  • तोरकडवाडी
  • खुरंगेवाडी
  • हंडाळवाडी
  • शेगुड
  • वायसेवाडी
  • बिटकेवाडी
  • जळकेवाडी
  • डोंबाळवाडी
  • करमणवाडी
  • माळेवाडी
  • गोयकरवाडी
  • रौकाळेवाडी
  • गणेशवाडी
  • चखालेवाडी
  • नेटकेवाडी
  • काळेवाडी
  • औटेवाडी
  • होलेवाडी
  • थेटेवाडी
  • परिटवाडी
  • सितपूर
  • देशमुखवाडी
  • देऊळवाडी
  • नागापूर

जामखेड तालुका : वाडीचे नवीन महसूली गावांत रुपांतर झालेली गांवे खालीलप्रमाणे

  • कोल्हेवाडी
  • दौंडवाडी
  • राजेवाडी
  • पिंपळवाडी
  • काटेवाडी
  • गुरेवाडी
  • सरदवाडी
  • डोळेवाडी
  • महारुळी
  • नागोबाचीवाडी
  • जायभायवाडी
  • चोभेवाडी
  • मुंगेवाडी
  • आनंदवाडी
  • पोतेवाडी
  • पांढरेवाडी
  • पारेवाडी
  • मतेवाडी
  • दरडवाडी
  • मुंंजेवाडी
  • भवरवाडी
  • माळेवाडी
  • वंजारवाडी (धानोरा)
  • वंजारवाडी (तरडगांव)
  • डिसलेवाडी

दरम्यान, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील वरिल गावांमध्ये पोलिस पाटील पदांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडून पुढील अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.