Agriculture News : “एक फोन काॅल अन् शेतकऱ्यांची समस्या दुर, ‘आपला तो आपलाच’ याचा शेतकऱ्यांना आला प्रत्यय,” शेतकऱ्यांनी मानले आमदार Ram Shinde यांचे आभार !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Agriculture News: पावसाने ओढ दिल्याने उपलब्ध पाण्यावर शेतातील पिके व फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.विजेचा लपंडाव आणि डिप्या जळण्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. जळालेल्या डिप्या तातडीने मिळण्यास अडचणी येत आहेत, परंतू आमदार प्रा.राम शिंदे यांनी एका फोन काॅलवर शेतकऱ्यांच्या डिपीची समस्या सोडवली आहे. यानिमित्ताने ‘आपला तो आपलाच’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आला आहे.

Agriculture News, One phone call and problem of farmers is gone, farmers thanks to MLA Ram Shinde, latest marathi news,

जामखेड तालुक्यातील जवळ्याच्या महादेवनगर येथील हजारे डीपी जळाली होती.डीपी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु होती. डीपी मिळावी यासाठी भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे यांच्या माध्यमांतून शेतकऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे फोनद्वारे समस्या मांडली होती. आमदार प्रा.राम शिंदे यांना गौतम कोल्हे यांचा फोन जाताच वेगाने सुत्रे हलली. आमदार प्रा.राम शिंदे यांनी जामखेड महावितरणशी संपर्क साधून महादेव नगरच्या शेतकऱ्यांना तातडीने डीपी देण्याचे आदेश दिले.

आमदार शिंदे यांच्या तत्परतेमुळे हजारे डीपी तातडीने बसवण्यात आली. अवघ्या 24 तासात डीपी बसवण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आमदार शिंदेंना एक फोन अन् काम तमाम याचा अनुभव महादेवनगरच्या शेतकऱ्यांना यानिमित्ताने आला.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना डिप्या मिळण्यात अडचणी येऊ नयेत यासाठी आमदार प्रा.राम शिंदे हे नेहमी आग्रही असतात. याचाच प्रत्यय जामखेड तालुक्यातील जवळा येथील शेतकऱ्यांना आला. डीपी मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा फोन जाताच आमदार राम शिंदे यांनी महावितरणशी संपर्क साधून तातडीने डीपी उपलब्ध करून दिली. तातडीने डीपी मिळाल्यामुळे महादेवनगरच्या शेतकऱ्यांनी आमदार प्रा राम शिंदे व भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे यांचे आभार मानले.

दरम्यान, जवळा येथील महादेवनगरमधील हजारे डीपी काल बसविण्यात आली. यावेळी भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गौतम कोल्हे, स्थानिक शेतकरी आत्माराम हजारे, अंगत हजारे, गोकुळ हजारे, दादा हजारे, अशोक हजारे, सतीश हजारे, संजय हजारे सह आदी उपस्थित होते.