Jamkhed Taluka | कोरोना निघालाय सुसाट : मंगळवारी दिवसभरात आढळले ८८ नवे कोरोनाबाधित

नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड शहरातील रूग्णांची संख्या सर्वाधिक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. (Jamkhed Taluka) रोज वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या तिसऱ्या लाटेचे संकेत देऊ लागली आहे. सध्या कोरोना सुसाट निघाला असुन त्याने शहरासह ग्रामीण भागाला संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे.

जामखेड तालुक्यात (Jamkhed Taluka) कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचा पुरता बोऱ्या उडाल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. मंगळवारी कोरोनाने पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. दिवसभरात तब्बल ८८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. 88 coronavirus patients found in Jamkhed taluka on Tuesday

जामखेड तालुका (Jamkhed Taluka) आरोग्य विभागाने आज दिवसभरात ६३७ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या तर ४६६ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये जामखेड शहरातील रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे.तर त्या खालोखाल हापटेवाडी रूग्णांची संख्या मोठी आहे. (Jamkhed Corona update)

(Jamkhed Taluka) जामखेड आरोग्य विभागाने केलेल्या ६३७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये १७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत यामध्ये जामखेड ०४, नानेवाडी ०६, जवळा ०२, शिऊर ०१, नान्नज ०१, लेहनेवाडी ०१, बोरला ०१, जमादारवाडी ०१, या रूग्णांचा समावेश आहे. (Jamkhed Corona update)

तर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR अहवालात ७१ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले यामध्ये जामखेड ११, हापटेवाडी १२, फक्राबाद ०८, खर्डा ०१, भुतवडा ०२, वंजारवाडी ०२, पिंपळगाव उंडा ०२, नायगाव ०१, नान्नज ०२, नागोबाचीवाडी ०२, तेलंगशी ०२, धोंडपारगाव ०२, जवळा ०२, कुसडगाव ०१, धोतरी ०३, वाघा ०३, पिंपरखेड ०१, मतेवाडी ०१, सोनेगाव ०१, पाडळी ०४, धनेगाव ०१, दौंडाचीवाडी ०३, गीतेवाडी ०१, वाकी ०१, सारोळा ०१ व इतर तालुका ०१ या रूग्णांचा समावेश आहे. त्यानुसार मंगळवारी दिवसभरात (Jamkhed Taluka) एकुण ८८ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.(Jamkhed Corona update)

जामखेड शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. आता प्रशासन कोणत्या उपाययोजना हाती घेणार ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक तिसऱ्या लाटेला पोषक ठरल्यास जामखेड तालुक्यात (Jamkhed Taluka) पुन्हा एकदा कोरोना मोठा विध्वंस घडवू शकतो हे मात्र निश्चित. (Jamkhed Corona update)

राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ९१० नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ७ हजार ५१० जण कोरोनामुक्त; १४७ मृत्यूमुखी