Scholarship Examination २०२१ | शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर !

'शिक्षक पात्र परीक्षा' (MAHATET-२०२१ ) घेण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (State School Education Minister Varsha Gaikwad) यांनी इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची (Scholarship Examination)आज घोषणा केली आहे.

दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. दोन्ही वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) ०८ ऑगस्ट रोजी होणार आहे याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत दिली आहे.

 

 

सन २०२० -२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) (Scholarship Examination) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून ०८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा, असं वर्षा गायकवाड (State School Education Minister Varsha Gaikwad) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

'शिक्षक पात्र परीक्षा' (MAHATET-२०२१ ) घेण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला (Maharashtra State Examination Council) मान्यता