जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण अंतर्गत जामखेड तालुक्यातील 10 गावांना जोडणाऱ्या ग्रामीण मार्ग आणि इजिमा रस्त्यांसाठी तब्बल 1 कोटी 65 लाख रूपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्या माध्यमांतून सदर कामांना मंजुरी मिळाली आहे.
जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाने जोडली जावीत यासाठी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आणि आमदार राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जोरदार पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले. जामखेड तालुक्यातील 10 रस्त्यांच्या कामांसाठी 1 कोटी 65 लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.
जिल्हा नियोजनमधून मंजुर झालेले रस्ते खालीलप्रमाणे
1) हळगाव तुकाईवस्ती ते नान्नज रस्ता – मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे- 15 लक्ष रूपये.
2) खर्डा मुंगेवाडी ते नागोबाचीवाडी रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे- 25 लक्ष रूपये.
3) आपटी ते गव्हाणवस्ती रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे- 20 लक्ष रूपये.
4) हळगाव ते मलठण रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे- 20 लक्ष रूपये.
5) पाटोदा ते डोणगाव (गव्हाणेवस्ती रस्ता नवीन पुलासह मजबुतीकरण करणे 15 लक्ष रूपये.
6) खामगाव ते अरणगाव रस्ता नवीन पुलासह मजबुतीकरण करणे 10 लक्ष रूपये.
7) खांडवी सुरवसे वस्ती ते डिसलेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष रूपये.
8) सारोळा ते राजुरी रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे- 15 लक्ष रूपये.
9) कडभनवाडी ते साकत रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे- 15 लक्ष रूपये.
10) राज्यमार्ग 55 ते नानेवाडी रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे- 15 लक्ष रूपये.