जामखेड तालुक्यातील 15 हजार बालकांनी घेतले पल्स पोलिओचे डोस (15,000 children in Jamkhed taluka took dose of pulse polio)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात रविवारी पार पडलेल्या पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेत 15 हजार 486  बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली सायंकाळी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (15,486 children in Jamkhed taluka took dose of pulse polio)

जामखेड तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाने तालुक्यात 128 लसीकरण बुथ कार्यान्वित केले होते. यासाठी 306 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. दिवसभरात जामखेड तालुक्यातील 16 हजार 344 लाभार्थी बालकांपैकी सुमारे 15 हजार 486 बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात आहे. रविवारी 95% लसीकरण करण्यात प्रशासनाला यश आले. (15,486 children in Jamkhed taluka took dose of pulse polio)

जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.  मनस्वी विशाल नाईकवाडे या चिमुकलीला पहिला डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, डॉ.कुंडलीक अवसरे, डॉ. शिंदे श्याम जाधवर, मिथुन  बाफना, अधिपरिचारिका सातपुते, माळी, बारसे सिस्टर, संजय कोठारी आदी उपस्थित होते.