Sanjay raut | संजय राऊतांनी काढली चंद्रकांत पाटलांची लायकी; राऊत ठोकणार ‘इतक्या’ रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांचा सामना जोरदार रंगला आहे.कुणी राजकीय भूकंपाची तर कुणी भ्रष्टाचाराचे आरोप करून ऐकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग आहेत.आरोपांचा स्तरही घसरू लागला आहे.(Sanjay Raut will file a defamation suit against Chandrakant Patil)

त्यातच आता भाजपच्या नेत्यांविरोधात अब्रुनुकसानीचे 100 -100 कोटींचे दावेही दाखल होऊ लागले आहेत. मात्र  बुधवारी एक नवा दावा भलताच चर्चेत आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत हेही आता चंद्रकांत पाटीलांविरोधात दावा ठोकणार आहेत.(Sanjay Raut will file a defamation suit against Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर आरोप केला आहे.पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे राऊत कुटूंबाला प्राप्त झाले असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे. यावरून आता चिडलेल्या संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना थेट कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.पुढच्या चार दिवसांत चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut will file a defamation suit against Chandrakant Patil)

संजय राऊत पुढे म्हणाले, मी नोकरदार माणुस आहे.घोटाळे करत बसलो असतो तर राजकारणात टिकलो नसतो असे म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

लोकं शंभर, पन्नास कोटींचा दावा करत आहेत.पण चंद्रकांत पाटलांची लायकी सव्वा रुपया असल्याने मी सव्वा रूपयांचा दावा करणार आहे असे म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.

web taital: Sanjay Raut will file a defamation suit against Chandrakant Patil