Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ, पण अजुनही ग्राहक फायद्यातच , जाणून घ्या सोन्या चांदीचे 22 सप्टेंबरचे दर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Gold Price Today 22 September | भारतीय सराफा मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात कमालीची घसरण झाली आहे. सोने थेट 10 हजाराने स्वस्त झाले आहे. मागील आठवड्यात दर घसरणीचा कल कायम होता. चालू आठवड्यात सोन्याच्या दर किंचित वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांना सोने खरेदीची हीच ती योग्य वेळ असल्याचे बोलले जात आहे. सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर अद्याप ४७ हजार रुपयांच्या खालीच आहे.

काल मंगळवारी सायंकाळी सोन्याच्या दरात (Gold Price) १२२ रुपयांची तेजी दिसून आली होती. आज बुधवारी सोने ३५८ रुपयांनी वाढले. यामुळे सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४६,८७१ रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही तेजी आली आहे. चांदीचा दर प्रति किलोमागे ७५४ रुपयांनी वाढला आहे. (Gold Price Today)

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Price Today बुधवारी २२ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४६,८७१ रुपये, २३ कॅरेट सोने ४६,६८३ रुपये, २२ कॅरेट सोने ४२,९३४ रुपये, १८ कॅरेट ३५,१५३ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,४२० रुपये होता. (Gold Price Today) तर चांदीचा प्रति किलो दर ६०,९५४ रुपयांवर पोहोचला आहे. (हे दर दुपारपर्यंतचे अपडेटेट असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)

दरम्यान, एमसीएक्सवर (MCX) आज गोल्ड फ्यूचर्समध्ये घसरण दिसून आली. येथे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,६३३ रुपयांवर होता. तर चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम) आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत. येथे सोन्याचा दर प्रति औंस दर १,७७५ डॉलरवर आहे. डॉलरमध्ये अन्य चलनांच्या तुलनेत तेजी दिसून येत आहे. (Gold Price Today)

नाशिकच्या सराफा बाजारातही तेजी ( Nashik Gold Price Today)

नाशिकच्या  (Nashik) सराफा बाजार पेठेत बुधवारी (22 सप्टेंबर) सोने (gold) महाग झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900 रुपये नोंदवले गेले. मंगळवारी हेच दर 46700 रुपये होते. त्यात जवळपास 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. 22 कॅरेट सोन्याचे दर बुधवारी 10 ग्रॅममागे 45500 रुपये होते. मंगळवारी हेच दर 44200 रुपये होते. या दरात जवळपास 1300 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. (Gold Price Today)

बुधवारी चांदीचे दर किलोमागे 61200 रुपये होते. मंगळवारी हेच दर 63600 होते. या दरात जवळपास 2400 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. (Gold Price Today)

(हे दर दुपारपर्यंतचे अपडेटेट असून सायंकाळपर्यंत त्यात बदल होऊ शकतो)