Supriya Sule Loksabha Speech | सुप्रिया सुळे लोकसभेत गरजल्या; कोणी कितीही जोर लावा पुढचे 25 वर्षे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : (MP Supriya Sule Loksabha Speech) राजकारण करायचचं आहे तर समोर हल्ले करा, बायका मुलांना टार्गेट कशाला करता ? असा थेट हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule Letest Speech) यांनी केंद्र सरकार तथा भाजपचे भर लोकसभेत (Parliament) वाभाडे काढले.

CVC विधेयक आणि दिल्ली पोलिस एस्टॅब्लिशमेंट विधेयकावर चर्चा सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule Loksabha Speech) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवला.

ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) या संस्थांचा केंद्र सरकारकडून (Central Government) गैरवापर होत असून या संस्थांच्या माध्यमांतून विरोधकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप करत सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, सीबीआय आणि ईडीचे छापे नेत्यांवर केले जायचे पण आता नेत्यांच्या बायका मुलांवर छापे टाकले जात आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex Home Minister Anil Deshmukh) यांच्या घरावर तर सात सात वेळा ईडीकडून छापे टाकून कुटूंबातील सदस्यांना त्रास दिला गेल्याचेही सुळे यांनी सांगितले.राजकीय नेत्यांवर हल्ले करायचेच आहेत तर समोरून करा, बायका मुलांना कश्याला टार्गेट करता असा सवाल करत काय चौकश्या करायच्या ते करा आम्ही तयार आहोत असे थेट अव्हान सुळे यांनी केंद्र सरकारला दिले.

भाजपचे महाराष्ट्रातील खासदार सार्वजनिक कार्यक्रमात बोलतात की, आम्ही भाजपमध्ये आलो आहोत त्यामुळे आता आमच्यावर छापेमारी होत नाही असे सांगताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Government Maharashtra) पाडण्यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न झाले.

आमचं सरकार पडणार पडणार असं अनेकदा सांगितलं जात मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकारने दमदारपणे दोन वर्षे पुर्ण केली आहेत. हे सरकार पाच वर्षे पुर्ण करणार आणि पुढील 25 वर्षे काम करणार असा विश्वास व्यक्त करत कुणाला किती जोर लावायचा ते लावा असे थेट अव्हान सुप्रिया सुळेंनी भाजपला दिले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या आक्रमक भाषणामुळे संसदेत काही काळ स्तब्धता पसरली होती. अगामी काळात केंद्र सरकारला थेटपणे अंगावर घेण्यासाठी विरोधक सज्ज आहेत असाच थेट इशारा सुप्रिया सुळेंनी दिला आहे. यामुळे अगामी काळात सरकार विरुद्ध विरोधक हा सामना अधिक रंगताना दिसेल हे मात्र निश्चित!