Cooperative politics | सहकाराच्या राजकारणात होणार रोहित पवारांची एन्ट्री : विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणूकीत रंगणार राष्ट्रवादी विरूध्द भाजप सामना

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | cooperative politics | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसह विविध कार्यकारी सेवा संस्थाच्या (Seva Sanstha elections) निवडणूकीचे बिगूल वाजलेले आहे.कर्जत- जामखेड मतदारसंघातील सहकाराच्या राजकारणात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) सरसावली आहे. सेवा संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मित्रपक्षांना सोबत घेत आपले पॅनल उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.त्यादृष्टीने चाचपणी केली जात आहे.

आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी सोसायटीच्या राजकारणात एन्ट्री करण्याची तयारी वेगाने हाती घेतली आहे. तसे थेट संकेत त्यांनी दिले आहेत.यामुळे अगामी काळात मतदारसंघात होणाऱ्या सेवा संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप विरूध्द राष्ट्रवादी ( BJP vs NCP) हा चुरशीचा सामना रंगताना दिसणार आहे.

सध्या जिल्हा बँकेच्या राजकारणात (District Bank Politics) भाजपचे वर्चस्व आहे कारण दोन्ही तालुक्यातील संचालक हे भाजपाचे पर्यायाने विखेंचे समर्थक (Vikhe supporters) आहेत. भाजपचे दोन्ही तालुक्यातील सहकारावर वर्चस्व आहे. जामखेड बाजार समिती (jamkhed market committee) आपल्या कब्जात यावी यासाठी सेवा संस्थाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे यश मिळणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्रातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी रोहित पवारांना मोठ्या खेळ्या खेळाव्या लागणार आहेत तरच पवारांचे सहकारावर वर्चस्व येऊ शकते.

जामखेड तालुक्यात एकुण 48 विविध कार्यकारी सेवा सोसायट्या कार्यरत आहेत. यातील 44 सेवा संस्थांची मुदत संपली आहे. पहिल्या टप्प्यात 07 सेवा संस्थांच्या निवडणूका कोणत्याही क्षणी लागू शकतात. मतदार याद्यांचा प्रारूप आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. दुसर्‍याच टप्प्यात ऊर्वरीत सोसायट्यांच्या निवडणूका होतील. साधारणता: मार्च 2022 अखेर किंवा त्या पुर्वी सर्व निवडणूका पार पडून नवे संचालक मंडळ अस्तित्वात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान जामखेड तालुक्यात अगामी काळात होऊ घातलेल्या सेवा संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी जोर लावणार असल्याचा इरादा आमदार रोहित पवार यांनी नान्नज येथे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केला आहे.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, जामखेड तालुक्यात सेवा संस्थांमध्ये गटातटाचे राजकारण केलं जाते, ठरावीक लोकांनाच सोसायटीच्या माध्यमांतून मदत केली जाते. ठराविक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण केलं जातं. बहुतांश सोसायटी जर असचं वागत असतील तर येत्या काळामध्ये तिथे असलेले सोसायटीचे सभासद, सदस्य, चेअरमन यांना विश्वासात घेऊन चांगला पॅनल तयार करून इलेक्शन लढवलं जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी बोलताना केली.

मतदारसंघात नव्या सोसायट्या आणणार का ? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, नक्कीच त्या प्रकारची संधी काही गावांना मिळणार आहे. काही लोकांना साधं सदस्य पद सुध्दा काही सोसायटींनी दिलेलं नाही आणि ज्या गावामध्ये लोकसंख्या आहे तिथं एखादी सोसायटी नाही अश्या गावांमध्ये एक सोसायटी व्हावी यासाठी अनेक लोकांचं म्हणणं आहे. अनेक लोक भेटलेली आहेत. पदाधिकारी असतील आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी आम्हाला भेटलेले आहेत. त्यांचं म्हणणं विश्वासात घेऊन नियमांमध्ये बसत असेल तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू असेही आमदार पवार यांनी स्पष्ट केले.