big breaking news | दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलेच : आमदार रोहित पवारांनाही कोरोनाची बाधा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात कोरोनाचा मोठा उद्रेक वाढला आहे. राज्यातील मंत्री खासदार, आमदार तसेच अन्य राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. अश्यातच कर्जत जामखेड मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

आमदार रोहित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 3 रोजी सायंकाळी आमदार रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. 

तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलेच, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशिर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत.

रोहित पवार आमदार, कर्जत – जामखेड

आमदार रोहित पवार हे उद्या 4 जानेवारी रोजी जामखेड तालुका गाव भेट  दौर्‍यावर येणार होते परंतू ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा उद्याचा जामखेड दौरा रद्द झाला आहे.