- Advertisement -

बाॅलीवूड, समीर वानखेडे, एनसीबी, खंडणी ते जलयुक्त शिवार  : आमदार रोहित पवार यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यात मागील महिनाभरापासून आर्यन खान ड्रग्स प्रकरण जोरदार तापलेले आहे.या प्रकरणातील तथाकथित मुख्य हिरो समीर वानखेडे यांच्याविरुध्द आरोपांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. एनसीबीने वानखेडेची चौकशी सुरू केली आहे. दुसरीकडे ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान सहीत अनेकांच्या जामीनाचा फैसला होने बाकी आहे. सध्या राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक विरूध्द समीर वानखेडे अर्थात एनसीबी हा सामना तुफान रंगला आहे. नवाब मलिक रोज वानखेडे यांच्यावर नवा आरोप करत आहेत. साक्षीदाराने खंडणी प्रकरण उजेडात आणले आहे.एकुणच एनसीबीच्या कारवाया ह्या संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. पवार हे बुधवारी जामखेडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जामखेड टाईम्सशी विविध विषयांवर सविस्तर संवाद साधला. एनसीबी प्रकरण असो की जलयुक्त शिवार घोटाळा यावर त्यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात NCB विरूध्द NCP यांच्यात जो आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे त्यात नवाब मलिक व समीर वानखेडे हे ऐकमेकांवर रोजच आरोप प्रत्यारोप करत आहेत, नेमकं या कारवाई संदर्भात काय वाटतं ? पुढे ही कारवाई कुठपर्यंत घेऊन जाईल ? कारण राज्यातले प्रश्न राहिले बाजूला आणि ड्रग्स सारखे मुद्दे आता राजकारणात यायला लागलेत नेमकं या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता ? असा प्रश्न आमदार पवार यांना विचारण्यात आला यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, राज्यातले इतर विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतर मंत्री लक्ष देऊन आहेत. विदर्भ व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालं त्यासाठी भरीव निधी देणं आणि केंद्राकडून पैसा न येताना सुध्दा त्याठिकाणी मदत करणे हे त्याठिकाणी महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे असे सांगत राज्यातील प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत नाही असा निर्वाळा पवार यांनी दिला.

एनसीबी विरूध्द एनसीपी यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले कि, केंद्राचे अधिकारी राज्यात येऊन जर खंडणी मागत असतील तर त्याच्यासारखी चुकीची गोष्ट कुठलीही नाही. अश्या प्रकारचं धाडस कुणीही करू नये या अनुषंगानेच जे काही आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, पण या आरोप प्रत्यारोपात जाण्यापेक्षा पुढच्या एका महिन्यात काय होतंय ते आपण पाहूयात असे सांगत पवार यांनी वानखेडेंवरील कारवाईचे तर संकेत दिलेच शिवाय वानखेडे हे खंडणीखोर आहेत असा थेट मेसेज दिला.

समीर वानखेडेंवर कारवाई होणार का ? या प्रश्नांवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, कारवाई करणारा मी तर नाही पण त्यांच्या विरोधात पुरावे असतील आणि एनसीबीच त्याच्यामध्ये कारवाई करेल, एनसीबीने वानखेडेंच्या बाबतीत तपास हाती घेतलाय. मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या बाबतीत जे काही सांगितलं आहे ते सगळं खरं झालेलं आपण बघू शकतो.

त्यामुळे आता बघूयात पुढच्या महिनाभरात काय होतयं. कदाचित एनसीबी त्यांना ठेवणार नाही. कुणीतरी बदलला जाईल. कारण एनसीबी केंद्राची एजन्सी आहे. वानखेडेंना जर एनसीबीने ठेवलं नाही तर समजून घ्या की, केंद्राला पण कळलयं वानखेडेंनी मुंबई येऊन काय केलं आहे ते असा टोला लगावत पवार यांनी वानखेडेंवर जोरदार निशाणा साधला.

दरम्यान एनसीबीने ज्या कारवाया केल्या त्यातून बाॅलीवूडल बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र  सुरू आहे का ? असा प्रश्न रोहित पवारांना विचारला असता पवार म्हणाले कि, खंडणी आणि पैसा हाच मुख्य विषय आहे. बाॅलीवूडला बदनाम करण्याचा हा विषय कदाचित नाही, पण केंद्राने एनसीबीला ताकद दिली मग एनसीबीचे अधिकारी त्या ठिकाणी खंडणी मागतात, त्यामुळे केंद्र सरकारचा त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांवर कंट्रोल राहिलेला नाही असं दिसतंय. आणि त्यांचे अधिकारी  लोकांकडे खंडणी मागण्यात जास्त व्यस्त आहेत आणि स्वता:ची मालमत्ता वाढवत आहेत. त्यामुळे याच्यामध्ये बाॅलीवूड हा विषय येत नाही.पण अधिकाराचा आणि एजन्सीचा वापर हा त्याठिकाणी राजकीय हेतूतून किंवा स्वता:चे हित जोपासण्यासाठी सर्व केंद्रीय एजन्सी करतायेत असाच सर्व खुलासा यातून होत आहे असे सांगत पवार यांनी थेट केंद्र सरकारला जबाबदार धरले.

केंद्र सरकारच्या ताब्यातील एजन्सींकडून जो काही हैदोस सुरू आहे त्याविरोधात पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी केंद्रीय यंत्रणा काम करत आहेत हेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न पवार यांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान राज्यात जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाल्याच्या तक्रारी आल्या. SIT चौकशी सुरू आहे. या चौकशीत क्लिनचिट मिळाल्याचे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता त्यांनी सविस्तर भाष्य करणे टाळले. कर्जत – जामखेड तालुक्यात करोडो रुपयांची कामे जलयुक्त मधून झाले. त्या कामांची चौकशी व्हावी यासाठी रोहित पवार यांनी लक्ष घातले होते. त्याचं काय झालं असं विचारलं असता त्यावरही पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली नाही.

जलयुक्त शिवार घोटाळ्याबाबत आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणाले ? पहा खालील व्हिडिओमध्ये ⤵️

First Publisher : jamkhedtimes.com 

web titel : Bollywood, Sameer Wankhede, NCB, Ransom to Jalyukat Shivar: MLA Rohit Pawar’s biggest reaction

वेब शीर्षक : बाॅलीवूड, समीर वानखेडे, एनसीबी, खंडणी ते जलयुक्त शिवार : आमदार रोहित पवार यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया