- Advertisement -

Today 5 Big News : अखेर शाखरूखची ‘मन्नत’ पुर्ण  : आर्यन खानला मिळाला जामीन यासह दिवसभरातील 05 मोठ्या बातम्या

मुंबई, 29 ऑक्टोबर : Today 5 Big News | गेल्या अनेक दिवसांपासून शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा सुपूत्र आर्यन खान याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आज 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याला जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे. आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे.

3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये अटक करण्यात आली होती. या ड्रग्स प्रकरणामुळे आर्यनसह इतर 7 जणांना कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. त्यांनतर या प्रकरणाला अतिशय गंभीर वळण लागलं होतं. यामध्ये दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

इतकंच नव्हे तर अभिनेत्री अनन्या पांडेच नावसुद्धा यामध्ये होतं पुढं आलं होतं. आर्यन आणि अनन्याचे व्हॉट्सअप चॅट्स समोर आले होते. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह, मुनमुन धमेचा आणि अरबाज खान यांना जामीन मंजूर केला आहे.

ड्रग्ज प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या अभिनेता शहारुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) अन्य दोघांनाही जामीन मिळाला आहे. आदेशाची प्रत उद्या मिळण्याची शक्यता असून, त्यानंतरच तुरुंगातून बाहेर येणार आहेत (All three, including Aryan Khan, granted bail)

गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.  निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, अशी माहिती मुकूल रोहतगी यांनी दिली. (All three, including Aryan Khan, granted bail)

साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. दरम्यान, आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर या प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना प्रतिक्रिया विचारण्यासाठी माध्यमांनी गराडा घातला.  त्यावर वानखेडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. नो कमेंट एवढंच म्हणून ते निघून गेले. (All three, including Aryan Khan, granted bail) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी आजही आर्यनला तुरुंगात राहावं लागणार आहे.

2) ड्रग्स प्रकरणात हॅकर मनिष भंगाळेची एन्ट्री

ड्रग्स प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात जळगावातील मनिष भंगाळे (Jalgaon)  या हॅकरने केलेल्या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळणं लागलं आहे. मनिष भंगाळे याने या प्रकरणाबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे लिखित तक्रार केली आहे. यात दिल्यानुसार पुराव्यांशी छेडछाड (manipulate the evidence) करण्यासाठी ५ लाखांची (hacker claims to have offered 5 Lacks) ऑफर देण्यात आली होती असा दावा भंगाळे याने केला आहे.

3) क्रुझ पार्टीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलाचा समावेश  – भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ

त्या पार्टीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा मुलगाही होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात पहिल्या दिवसापासूनच रंगलेली होती. आता याच मुद्द्यावरून भाजपचे मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना यांना काही प्रश्न विचारले आहेत. कंबोज आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याची मुलगी क्रूझवरील पार्टीत होती? राष्ट्रवादीच्या कोणत्या वरिष्ठ मंत्र्याचा मुलगा क्रूझवरील पार्टीत त्यांच्या मित्राबरोबर सहभागी झालेला होता? ते जहाजात का चढले नाहीत, ते तेथून पळून का गेले?’, असे तीन प्रश्न मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना विचारले आहेत. यामुळे आता मलिक विरूध्द वानखेडे या वादानंतर  आता मलिक विरूध्द कंबोज हा नवा अंक सुरू झाला आहे

4) समीर वानखेडे यांच्या झेड प्लस सुरक्षेवरून संजय राऊत आक्रमक

संजय राऊत म्हणाले, “समीर वानखेडे प्रकरणात चौकशी करावीच लागेल. एखाद्याला झेड प्लस सुरक्षा मिळाली तर त्याची चौकशी करायची नाही असं नाही. सध्या केंद्र सरकार जो महाराष्ट्राला बदनाम करेल, राज्य सरकारवर आरोप करून बदनाम करेल त्याला ३६ लोकांची झेड प्लस सुरक्षा पुरवत आहे. यातून केंद्र अशा लोकांचा सन्मान करत आहे. महाराष्ट्र एक सुरक्षित राज्य आहे. इथं सर्व लोक सुरक्षित आहेत. जर एखाद्या अशा व्यक्तीला सुरक्षा मिळत असेल तर केंद्राकडे खूप सुरक्षा आहे असं दिसतंय. त्यांना काम नसेल तर ही सुरक्षा त्यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशमध्ये पाठवली पाहिजे.”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या खंडणी गोळा केल्याच्या गंभीर आरोपानंतर केंद्र सरकारने दिलेल्या झेड प्लस सुरक्षेवर सडकून टीका केलीय. “सध्या केंद्र सरकार महाराष्ट्राला, राज्य सरकारला बदनाम करणाऱ्यांना ३६ लोकांची झेड प्लस सुरक्षा देत आहे.यातून केंद्र सरकार त्यांचा सन्मान करत आहे. मात्र, झेड प्लस सुरक्षा पुरवली म्हणजे चौकशी होणार नाही असं नाही. समीर वानखेडे यांची चौकशी नक्की होणार,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना बोलत होते.

5) हा तर विरोधी पक्षांचा मोठा विजय – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “या देशातील पत्रकार, खासदार, सरकारमधील २ केंद्रीय मंत्री, राजकारणी, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन इस्राईलच्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून ऐकले जात होते. या प्रकरणी न्यायालयानं चौकशी समिती स्थापन करून तपासाचा निर्णय घेतलाय. हा विरोधी पक्षांचा मोठा विजय आहे. संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे.”

“पेगॅससवरून संसदेचं संपूर्ण अधिवेशन गेलं, पण सरकारने त्यावर संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची तयारी दाखवली नाही. सरकारकडून ना गृहमंत्री बोलले, ना पंतप्रधान बोलले. सर्वोच्च न्यायालयासमोर अनेक गोष्टी आणल्या. त्यानंतर न्यायालयाला या प्रकरणात तथ्य असल्याचं आणि चौकशी व्हावी असं वाटलं. त्यासाठी एका समितीचं गठण करण्यात आलंय,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.