माजी मंत्री राम शिंदेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेल्या माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्यात शनिवारी दुपारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गुप्त बैठक झाल्याची बातमी समोर आली आहे. (A secret meeting was held between Deputy Chief Minister Ajit Pawar and former Minister Prof. Ram Shinde on Saturday at Ambalika Sugar Factory in Karjat taluka.) या बैठकीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. या कथित भेटीचा अधिकृत तपशिल रात्री उशिरापर्यंत समोर न आल्याने भेटीचे गुढ मात्र वाढले आहे. ( Former minister Ram Shinde offered to join NCP? )

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री प्रा. राम शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये अंबालिका साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत दुपारी साडेतीन वाजता ही गुप्त बैठक पार पडली. तब्बल अर्धा तास ही बैठक सुरू होती. बैठकीचा अधिकृत तपशील मात्र समोर येऊ शकला नाही. (A secret meeting was held between Deputy Chief Minister Ajit Pawar and former Minister Prof. Ram Shinde on Saturday at Ambalika Sugar Factory in Karjat taluka.) माजी मंत्री राम शिंदे यांनी शनिवारी अजित पवारांची घेतलेली कथित भेट राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. ही भेट सत्तापरिवर्तनासाठी की राम शिंदेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेसाठी होती ? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार व राम शिंदे यांची नियोजीत भेट नेमक्या कोणत्या कारणामुळे पार पडली  याचा अधिकृत तपशील जोवर उघड होत नाही तोवर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना ऊत मात्र येणार  आहे. (Former minister Ram Shinde offered to join NCP? )

उपमुख्यमंत्री पवारांनी राम शिंदेची भेट घेऊन पुतण्या रोहित पवारांचा अगामी मार्ग मोकळा करण्यासाठी तर कुठला नवा राजकीय डाव तर टाकला नाही ना ? कि फडणीसांचा विशेष निरोप घेऊन राम शिंदे हे अजित पवारांच्या भेटीला तर गेले नव्हते  ना ? कि या भेटीतून राम शिंदेंना खासदारकीची उमेदवारी देण्याबाबतची राष्ट्रवादीची ही चाचपणी तर नव्हती ना ? असे अनेक प्रश्न आता मतदारसंघात चर्चेला आले आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राम शिंदेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिल्याचीही चर्चा मतदारसंघात आता जोरदार चर्चिली जाऊ लागली आहे. (Former minister Ram Shinde offered to join NCP )

एकिकडे पवार व शिंदे यांची अंबालिकावर कथित बैठक सुरू असतानाच दुसरीकडे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar ) हे जामखेड तालुका दौर्‍यावर होते. आज अंबालिकावर पार पडलेल्या कथित बैठकीच्या घडामोडीवर आमदार रोहित पवार हे नेमकं काय भाष्य करणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.