- Advertisement -

रोहित पवारांची कार्यपद्धती पाहता जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ  

कर्जत । डाॅ अफरोज पठाण । कर्जत – जामखेड मतदारसंघात (Karjat – Jamkhed constituency) सध्या माजी मंत्री राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार (Ram Shinde Vs Rohit Pawar) असा कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार रोहित पवारांनी जामखेडमधील हळगावमध्ये (in Halgaon,Jamkhed taluka) पत्रकारांशी बोलताना पाच वर्षानंतर मी केलेला विकास पाहून राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील असे वक्तव्य केले होते.या वक्तव्याचे पडसाद आता मतदारसंघात उमटू लागले आहेत.

कर्जत भाजपने (Karjat BJP) रोहित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेत तुफान हल्लाबोल केला आहे.मागील दोन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांनी विकासाचे एक ही मोठे काम केलेले नसून त्यांचा विकास सोशल मीडिया, भिंतीवर आणि कागदावरच सुरू आहे. सध्यातरी मतदारसंघात लहरी राजा – आंधळी प्रजा आणि अंधातरी दरबार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी घणाघाती टीका कर्जत भाजपचे नेते दादा सोनमाळी (Karjat BJP leader Dada Sonamali) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोहित पवारांवर केली आहे.

यावेळी आपल्या प्रसिद्धी पत्रकात सोनमाळी यांनी आमदार रोहित पवार यांनी दोन वर्षात मतदारसंघात एक ही मोठे विकासकाम केले नसल्याचे स्पष्ट सांगितले. पूर्वीच मंजूर असलेली कामे सध्या सुरू असून ती कामे सुद्धा नित्कृष्ट होत असल्याने त्यास जबाबदार कोण ? असा सवाल सोनमाळी यानी उपस्थित केला आहे.

येत्या सहा महिन्यात मतदारसंघातील विकासकामे पाहून माजीमंत्री राम शिंदे यांचे डोळे पांढरे होतील असे आ पवार म्हणत असताना तुमच्या कार्य पद्धतीमुळे जनतेचे डोळे पांढरे होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपण पोलीस बंदोबस्त घेवून फिरत आहात असा टोला सोनमाळी यांनी लगावला आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख (Cabinet Minister Shankarrao Gadakh) कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहत नाही. मात्र स्वता:आमदार आणि त्यांचे नातेवाईक मतदारसंघात येताच हे अधिकारी जातीने उपस्थित राहत असल्याची वस्तुस्थिती सोनमाळी यांनी विषद केली.

प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या कारभाराची चौकशी करा

वास्तविक पाहता माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांच्या प्रयत्नातून अहमदनगर सोलापूर महामार्गाचे काम मंजूर झाले. खातेदार आणि लाभार्थी यांच्या नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला होता मात्र यामध्ये अनेक ठिकाणी काळंबेरं झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला.याबाबत खा सुजय विखे यांच्याकडे अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. तत्कालीन प्रांताधिकारी अर्चना नष्टे (Prantadhikari Archana Nashte) यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कारभाराची चौकशी करावी अशी मागणी दादासाहेब सोनमाळी यांनी केली आहे.

शासकीय अधिकारी की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते?

कॅबिनेट मंत्री तालुक्यात असताना कोणतेही  प्रमुख अधिकारी त्यांच्या प्रोटोकॉलला उपस्थित होत नव्हते मात्र रोहित पवार आणि त्यांचे कुटुंबीय मतदारसंघात असताना तेच सर्व अधिकारी त्यांच्या दिमतीला हजर राहतात. नेमके अधिकारी- अधिकारीच आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे असा गंभीर आरोप यावेळी सोनमाळी यांनी प्रसिद्ध पत्रकात केला आहे.

पहा : आमदार रोहित पवारांचे जामखेडमधील ते वक्तव्य ⤵️

पहा : माजी मंत्री राम शिंदे यांचे वक्तव्य

पहा : खासदार सुजय विखे यांची जोरदार फटकेबाजी ⤵️