- Advertisement -

नागरिकांनी कुटूंबातील सदस्याप्रमाणे पोलिसांना साथ द्यावी- पोलिस अधिक्षक ए-राजा

आष्टी : सध्या पोलिस दलात बीड (beed) जिल्ह्यासाठी सहा हजार कर्मचा-यांची गरज असतांनाही, केवळ अडीच हजार कर्मचा-यांवर कामकाज चालू आहे. मात्र हे सगळं नागरीकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले असून यापुढे ही सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांबाबत भिती न बाळगता आपल्या कुटूंबातील सदस्य समजून साथ देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलिस अधिक्षक ए राजा यांनी केले. (Superintendent of Police A Raja (IPS)

आष्टी पोलिस ठाण्याच्या (Ashti police station) वार्षिक तपासणीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक ए. राजा यांनी आष्टीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आष्टी तालुक्यातील पोलिस पाटलांसह नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी पोलिस उपविभागीय अधिकारी विजय लगारे (DYSP Vijay Lagare) , सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय देशमुख (API Vijay Deshmukh) यांच्यासह आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना पोलिस अधिक्षक ए.राजा म्हणाले की, राज्य घटनेच्या आधारावर प्रत्येक नागरीकांची प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी असली तरी बरेच नागरीक मात्र आपली जबाबदारी स्विकारण्यासाठी पुढे येत नाहीत. सर्वसामान्य नागरीकांनी जर हीच जबाबदारी निपक्षपणे संभाळली तर पोलिस प्रशासनाला काम करण्यास मदत होईल. तसेच तरूण पिढी मोठ्या प्रमाणात व्यासनाधीन होत असून दारू, पत्त्या, मटका या जुगारामुळे कुटूंबाचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

त्यामुळे तरुणांनी व्यसनाधिन होण्यापेक्षा आपलं भविष्य अन् शिक्षणासह कुटूंबिक परिस्थितीकडे अगोदरच लक्ष देण्याची आवश्यकताआहे. त्यामुळे संभाव्य घटनेचा अनर्थ टाळेल. प्रत्येक नागरीकांनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची गरज असल्याचे आवाहन ए. राजा यांनी केले.

आष्टी हे मोठे शहर झाले असून, पी-वन-पी-टू चे महत्व कळत नाही. त्यामुळे शहरात कायमच ट्राॅफीक पोलिस कर्मचा-यांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी पत्रकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे यांनी केलीपोलिस मिञ अनंत जोशी, सामाजिक कार्यकर्ते संदिप खाकाळ व इतरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष सुनिल रेडेकर, अनिल ढोबळे, सचिन लोखंडे, मनोज सुरवसे, सागर धोंडे, कपिल अग्रवाल,शम्मुभाई यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.