जामखेड : चोंडीत पार पडला भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भाजपच्या अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीत वर्णी लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांच्या नवनिर्वाचित तालुकाध्यक्षांचा गुरूवारी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

felicitation of newly elected office bearers of BJP was held in Chondi, ram shinde news Jamkhed,

भाजपच्या अहमदनगर जिल्हा सरचिटणीसपदी सचिन पोटरे, सोमनाथ पाचरणे, किसान आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल काका यादव तर भटक्या विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश पालवे तसेच कर्जत भाजपच्या तालुकाध्यक्षपदी शेखर खरमरे व जामखेड भाजपच्या तालुकाध्यक्षपदी अजय दादा काशीद यांची निवड झाल्याबद्दल आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

felicitation of newly elected office bearers of BJP was held in Chondi, ram shinde news Jamkhed,

हा कार्यक्रम आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी पार पडला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कर्जतचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, जामखेडचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, सरचिटणीस लहू शिंदे, शोएब काझी, पप्पू शेठ धोदाड, अनिल हजारे, आप्पासाहेब ढगे, विष्णू गंभीर, प्रविण बोलभट, ऋषीकेश मोरे, सह आदी उपस्थित होते.