Tamil Nadu Army Helicopter crash kills 13 including CDS Bipin Rawat | दु:खद : हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू , देशावर पसरली शोककळा !

तामिळनाडू : तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात बुधवारी दुपारी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्याची घटना समोर आली होती. या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपुर्ण देशावर शोककळा पसरली आहे. (Tamil Nadu Army Helicopter crash kills 13 including CDS Bipin Rawat)

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत  आपल्या पत्नी व इतर 14 लष्करी अधिकाऱ्यांसोबत हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. तामिळनाडूतील कन्नूरच्या जंगलात एमआय-१७ हे हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना बुधवारी घडली होती. घनदाट जंगलात झालेल्या या भीषण अपघातानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला होता.

या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे.चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत व पत्नी मधुलिका यांच्याही या अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण देशात शोककळा पसरली आहे.