Mysore Darbhanga Bagmati Express News : म्हैसुर दरभंगा बागमती एक्स्प्रेस रेल्वे मालगाडीला धडकली, तामिळनाडूतील कावरपेट्टई स्टेशनजवळ रेल्वेचा अपघात,12 डबे रूळावरून घसरले तर रेल्वेला लागली भीषण आग
Mysore Darbhanga Bagmati Express News : दक्षिण भारतातून रेल्वे (Train Accident) अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री तामिळनाडूत (Tamilnadu) म्हैसूर – दरभंगा – बागमती एक्स्प्रेस या रेल्वेचा भीषण अपघात झाला. या रेल्वेने मालगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे रेल्वेला आग लागली तर रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरले. अपघाताची ही घटना तामिळनाडूतील कावरपेट्टई स्टेशनजवळ घडली. या अपघातात जिवीत हानी झाली नाही. (mysore darbhanga bagmati express accident today)
तामिळनाडूतील चैनई जवळील कावरपेट्टई स्टेशनजवळ बिहारला जाणारी म्हैसूर दरभंगा बागमती एक्स्प्रेस रेल्वे मालगाडीला धडकली. ही घटना शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास घडली. या अपघातानंतर रेल्वेला आग लागली. तर रेल्वेचे 12 डबे रूळावरून घसरले. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात जिवित हानी झाली नाही, परंतू अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, पोलिस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य हाती घेतले आहे. अग्निशमन दलाबरोबरच एनडीआरएफ तसेच एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर घटना कशी घडली ? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.